जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन | बीड
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दिलेल्या प्रपत्र 1 मधील सुचनेनुसार गुरुवार दि. 28 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी 1 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे,
बैठकीस राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, प्रतिष्ठीत नागरिक यांना निमंत्रित करण्यात आले असून, बैठकीस उपस्थित राहतांना आपले आधार कार्ड इत्यादी ओळखपत्र सोबत ठेवावेत.