सीबीएसई इयत्ता दहावीत 23 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक मार्क मिळवले
आर्य नाल्पे, स्वराज सावंत, स्वरा कुलकर्णी, श्रावणी पवार, रिद्धी किन्हीकर, राजनंदिनी जाधव, झुनैरा खान विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
By MahaTimes ऑनलाइन | बीड
इयत्ता दहावीचा सीबीएसई (CBSE Board Class X) बोर्डाचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर (Result declared online) झाला. परीक्षेचा निकाल पाहताच विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आनंदाचे वातावरण दिसून आले. शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल ची सलग चौथ्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम (tradition of results continues) ठेवली आहे.

यावर्षी पोदार स्कूलमधून तब्बल ८१ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ८१ पैकी ८१ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत तर पोदार स्कूलची विद्यार्थीनी आर्य नाल्पे ९९.६० टक्के संपदान करत विशेष प्रावीण्य मिळवले. पोदार स्कूल मधील एकूण 23 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक मार्क मिळवले आहेत तर पोदार स्कूलमधील 80 % ते 90% टक्के संपादन केलेले 17 विद्यार्थी आहेत.या आकड्यावरून लक्षात येते की पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद घवघवित यश मिळवले आहे.

आर्य नाल्पे ९९.६०, स्वराज सावंत 98.80, स्वरा कुलकर्णी 98.80, श्रावणी पवार 98.00, रिद्धी किन्हीकर 97.80, ध्रुव औटी 97.20, राजनंदिनी जाधव 97.00, झुनैरा खान 96.60, श्लोक बागले 96.60, निधी मुंदडा 96.40, विश्वजीत शिंदे 96.20, शंतनू तांबडे 96.20, अनुराग धांडे 95.00, श्रेयश मुंदडा 95.00, अपेक्षा खेडकर 94.60, आर्या शिंदे 94.20, अभिजीत पवार 93.60, वैष्णवी मुंडे 93.20, लौकिक शेटे 92.00, वंशिका चंद्र 91.60, सोहम सारुक 91.20, अथर्व घायाळ 91.20, आश्लेषा आंधळे 91.00, अर्जुन तांबे 90.60, राज वाघमारे 90.00 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पोदार स्कूलचे प्राचार्या डॉ. प्रतीक्षा जोहरी मॅडम, उपप्राचार्य सुदर्शन खनगे सर, सर्व शिक्षक आणि पालकांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
