यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत
By MahaTimes ऑनलाइन | नवी दिल्ली
New President of India – राष्ट्रपती पदासाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली यामध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला आहे. मुर्मू या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.
मतमोजणी आधीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. कारण भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चोबाधणी केलेली होती. या निवडणुकीत 17 खासदारांनी आणि 100 पेक्षा जास्त आमदारांनी या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं आहे.
या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीसाठी 99 टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 100 टक्के मतदान पार पडले होते.
राष्ट्रपतीपदासाठी 771 खासदार आणि 4025 आमदारांसह 4796 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांपैकी 50 टक्के मते मिळाली.
कोण आहेत दौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या आहेत. मुर्मू हे झारखंडच्या राज्यपाल राहिल्या आहेत. मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओरिसात झाला. मुर्मू यांचं पदवी शिक्षण भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून झालं. मुर्मू यांनी पदवीनंतर शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी काही वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलं. मुर्मू यांनी 1979 ते 1983 दरम्यान सिंचन आणि विभागात ज्युनिअर असिस्टंट (कनिष्ठ सहाय्यक) म्हणून काम केलं. त्यानंतर मुर्मू यांनी 1994 ते 1997 हे 3 वर्ष रायरंगपूरमधील अरबिंदो इंटीगरल एज्युकेशन सेंटरमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणूनही काम केलं. मुर्मू यांच्या जीवनात एक काळ असा होता जेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे मुर्मू मानसिकरित्या पूर्णपणे तुटल्या होच्या. मुर्मूयांना 2009 मध्ये मोठा धक्का बसला. मुर्मू यांच्या मोठ्या मुलाचा वयाच्या 25 वर्षी रस्ते अपघातात मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन करणं खूप कठीण झालं.
Droupadi Murmu Is New President of India : Celebrating Murmu’s win angainst Sinha folk artist also performed a tribal dance at Mother Teresa Crescent Road in Delhi. Murmu has become the first leader born after independence to reach this top post and also she became the first tribal and the youngest president of the country.