खंडेश्वरी परिसरात घडलेल्या घटनेने शहरात खळबळ
By MahaTimes ऑनलाइन | बीड
खंडेश्वरी परिसरात एका तरूणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी भरदुपारी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. उत्तरेश्वर हौसराव भोसले (21, रा. बोरखेड, हल्ली मु, गांधीनगर, बीड) असे मृत युवकाचे नाव आहे.

चोरीच्या मोबाईलच्या पैश्यावरून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दीपक संतोष गोरे (25, रा. लोणारपुरा, बीड) याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ही हत्या झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खंडेश्वरी रोडच्या परिसरामध्ये आज दुपारी एका तरूणाला मारहाण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. गणेश नावाच्या व्यक्तीने फोनवरून पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर हा हत्येचा प्रकार उडकीस आला. यानंतर पेठ बीडचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रु ग्णालयात नेण्यात आला. हे वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.
