दहा मृतदेहांची ओळख पटली; मृतांमध्ये बसच्या वाहक-चालकाचा समावेश
मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, शिंदे सरकारची घोषणा
By MahaTimes ऑनलाइन | मुंबई
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथुन अमळनेर कडे मार्गस्थ झाली. आज सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी 10 जणांची ओळख पटली आहे. बस नदीत कोसळल्यानंतर काही जण पोहत नदीच्या किनारी आले तर काहीजण खडकांचा आधार घेत तिथेच थांबून राहिले. प्रशासनातर्फे या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जवळपास 25 ते 27 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे, तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले.
13 मृतदेह नदीतून काढण्यात आले, दहा मृतदेहांची ओळख पटली
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये 8 पुरूष, 4 स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे. बसमध्ये जवळपास 50 प्रवासी होते. जळगाव जिल्हा आणि धार येथील स्थानिक प्रशासनातर्फे बसमधील प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेत अनेक जण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
12 people dead, 15 rescued after a Maharashtra Roadways bus going from Indore to Pune falls off Khalghat Sanjay Setu in Dhar district, says Madhya Pradesh minister Narottam Mishra. pic.twitter.com/h4FuW2B3Ch
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 18, 2022
एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार 1.चेतन चे वडील राम गोपाल जांगिड़ निवासी नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान, 2.जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी उम्र 70 वर्ष निवासी मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान, 3.प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी वय 40 वर्षे निवासी शारदा कॉलोनी अमलनेर जलगांव महाराष्ट्र, 4.नीबाजी यांचे वडील आनंदा पाटिल उम्र 60 साल निवासी पीलोदा अमलनेरगां, 5. कमला भाई पति नीबाजी पाटिल वय 55 वर्षे राहणार सी पिलोदा अमलनेर जळगांव, 6.चंद्रकांत यांचे वडील एकनाथ पाटील वय 45 वर्षे राहणार अमलनेर जलगांव (उपरोक्त 1 से 6 पर्यंत के मृतकाची ओळख आधार कार्ड व्दारे केलेली आहे), 7.श्रीमती अरवा याचे पती मुर्तजा बोरा वय 27 वर्षे निवासी मूर्तिजापुर अकोला महाराष्ट्रातील नातेवाईकांव्दारे ओळख, 8.सैफुद्दीन यांचे वडील अब्बास निवासी नूरानी नगर इंदौर नातेवाईकांव्दारे ओळख पटलेली आहे. 9) चालक -चंद्रकांत एकनाथ पाटील व 10) वाहक-प्रकाश श्रावण चौधरी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. याशिवाय अद्याप तीन मृतदेहांची ओळख पटणे बाकी आहे.
आज दुःख होणार अशी बातमी आली सकाळी जयदीप पटेल 9522233333 मंत्री प्रदेश भाजपा यांनी निरोप दिला एक बस पुणे येथून निघाली होती ती पुलावरून पडली आहे संबंधित लोकांना कळवले पण बातमी सुन्न करून गेली कोणाला काही माहिती मदत हवी असल्यास MP च्या टीम शी बोलावे किंवा माझ्याशी संपर्क साधावा..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 18, 2022
अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून. अपघातात अद्याप किती लोक असतील याची माहिती मिळालेली नाही. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीमहामंडळाकडून दहा लाख रूपये मदत देण्यात येते तसेच रूग्णालयात उपचारासाठी दाखल रूग्णांचा उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022/23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे.एसटी महामंडळाकडून दुपारी 1.30 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार ही माहिती प्रसिध्दीसाठी देण्यात येत आहे.
मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, शिंदे सरकारची घोषणा
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.