एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद
By MahaTimes ऑनलाइन | मुंबई
देशाच्या 16 व्या राष्ट्रपतीपदासाठी आज (रविवार) शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली ( राष्ट्रपती निवडणूक – 2022 ). यासाठी 4,796 मतदारांचं मतदान यादीत नाव होतं. यांपैकी 99.18 % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगानं ही माहिती दिली.
राष्ट्रपतीपदासाठी शांततेत निवडणूक पार पडली. यासाठी 4,796 मतदार मतदानासाठी पात्र होते. पण यांपैकी 99.18 टक्के मतदारांनीच प्रत्यक्ष मतदान केलं. गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, पुद्दुचेरी, सिक्कीम आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये 100 टक्के मतदान पार पडलं.
राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे उमेदवार द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा हे होते. द्रौपदी मुर्मू यांना 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. मूर्म राष्ट्रपतीपदी नियुक्त झाल्यास त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या असतील. 25 तारखेला राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. ( राष्ट्रपती निवडणूक – 2022 )