सोलापूर येथील यशोधरा प्रशालेच्या शिक्षकाचा कोल्हापूरात सन्मान
By MahaTimes ऑनलाइन | सोलापुर
येथील आदर्श शिक्षक नूरअहमद बशीर कारंजे यांना नुकताच इचलकरंजी, कोल्हापूर येथे मानाचा राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण व विशेष योगदानाबद्दल श्री. कारंजे यांना यापुर्वी राष्ट्र-आंतर्रराष्ट्रियस्तरावरील पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक योगदान देणाऱ्या कोल्हापुर येथील अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन च्यावतीने लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथे आयोजित सन्मान सोहळ्यात श्री. नुरअहमद बशीर कारंजे यशोधरा प्रशाला, सोलापूर. यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार 2022 सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे – पाटील, समाजसेविका डॉ. सौ. सुमित्रा पाटील तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री संजय पवार व इतर मान्यवरांंच्या शुभ हस्ते मानपत्र व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. यापूर्वी ही नूरअहमद कारंजे यांना राज्य, राष्ट्र व आंतर्रराष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार प्राप्त झालेले असून गेल्यावर्षी डिसेंबर महिण्यात त्यांनी दिल्ली येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात मेंटोरएक्स, दिल्ली व काईट्सक्राफ्ट प्रॉडक्शन, पंजाबच्यावतीने त्यांना वर्ष 2021 चा मानाचा इंटरनेशनल एजुकेशन अवार्ड पुरस्कार मिळालेला आहे.
नूरअहमद कारंजे अल्प परिचय
आदर्श शिक्षक नूरअहमद बशीर कारंजे सोलापुर येथील यशोधरा प्रशाला येथे सह शिक्षक पदावर कार्यरत आहेत. गेली दोन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानासह अध्ययन, अध्यापनात नाविण्यपूर्ण संशोधनासाठी ते सदैव प्रयत्नरत असतात. तसेच त्यांनी कोरोना सारख्या जागतिक महामारी कालावधीत लॉकडाऊन दरम्यान इयत्ता 10 वी च्या विदयार्थांसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाच्या गुगल फॉर्मवर चाचणी व व्हिडीओ तयार केले.
व्हाट्सअप व युट्युबच्या माध्यमातून थेट विद्यार्थी पर्यत पोहोचले. याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना झाला. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते कार्य करतात. लॉकडॉउन दरम्यान ज्ञानदानाबरोबरच त्यांनी स्वत: ऑनलाइनच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा देऊन शेकडोअधिक प्रमाणपत्र प्राप्त करु न आपल्या योग्यतेवर जणू कांही शिक्कामोर्तब केले आहे.