By MahaTimes ऑनलाइन | बीड
शहरातील बालेपीर, गोर्हे वस्ती आदी भागातील असंख्य युवकांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवार (दि.१४) रोजी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
गेल्या तीन दिवसांपासून बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे बीड नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. अनुक्रमे मंगळवार, बुधवार व गुरूवार रोजी प्रभागानुसार मुलाखती झाल्या. गुरूवार (दि.१४) रोजी प्रभाग क्रमांक १,९,१०,११,१२,१३,१४,१५,२६ च्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीस जवळपास २५० इच्छुकांनी उपस्थित राहून मुलाखत दिल्या.
दरम्यान शहरातील बालेपीर, गोर्हे वस्ती आदी भागातील असंख्य युवकांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सुनील धांडे, माजी आ.सय्यद सलीम, जेष्ठ नेते ॲड.डी.बी.बागल आदी उपस्थित होते.