हाडांच्या आजारावर मात करण्यासाठी सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन
By MahaTimes ऑनलाइन | बीड
येथील कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये हाडांची ठिसुळता (ऑस्टिओपोरोसीस) मोफत तपासणी शिबीर येत्या सोमवार (दि 18 जुलै ) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजीत केले आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये वतीने करण्यात आले आहे.
वयाच्या चाळीशीनंतर स्त्री व पुरुष या दोघांमध्ये हाडाची ठिसुळता (बीएमडी) ही आढळते. हाडाची ठिसुळता म्हणजे हाडांतील कॅल्शिअम कमी होवून हाडे ठिसुळ व कमकुवत बनतात आणि यामुळे पुढे वरचेवर फ्रॅक्चर व सांधेदुखीचे वयाबरोबर वाढलेले प्रमाण वाढते. स्त्रीयांना रजोनिवृत्तीनंतर वाढत्या वयाबरोबर हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण 30 ते 40 टक्केपर्यंत कमी झालेले आढळते. हाडाची ठिसुळता याच्याकरिता उपचार पद्धती उपलब्ध आहेत. बाहेर इतरत्र ठिकाणी या तपासणीसाठी 1500 ते 2000 रुपये खर्च येणारी ही तपासणी मोफत असून या सुवर्णसंधीचा लाभ घेवून आपल्याला भविष्यात होणार्या हाडांच्या आजारावर मात करण्यासाठी मात करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलकडून करण्यात आले आहे.
सदरील शिबिर कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटल, आदर्श नगर, तहसील ऑफीस रोड, बीड येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी 7020590788 वर संपर्क करावे.