शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला
By MahaTimes ऑनलाइन | बीड
शिवसेनेने ज्यांना राजकारणात मानाचे पान दिले तेच आज शिवसेना संपवायला निघालेले आहेत. ज्या आनंद दिघे साहेबांनी शिवसेना घडवण्यासाठी उभे आयुष्य घालवले त्यांचा गद्दारांना क्षमा नाही हा मूलमंत्र हे गद्दार विसरले आहेत. असे मराठवाडा संपर्क नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना सांगितले.
ते शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आज बीडमध्ये आले होते पुढे बोलताना म्हणाले की भारतीय जनता पार्टी संपूर्ण शिवसेना फोडायला निघाली होती त्यात ते शतप्रतिशत यशस्वी झाले कारण आपल्यातलेच जेव्हा गद्दार निघाले. शिवसेनेची गद्दारी करणारा आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही हा इतिहास आहे असेही खरे म्हणाले.
महाराष्ट्रात सुरू असलेले षडयंत्र सबंध हिंदुस्थानानी पाहिले की एका संयमी, मुत्सद्दी, शांत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. आमदार गेले तरी चालतील पण आमदार घडवणारा आपल्यासमोर असला पाहिजे हीच शिवसैनिकांची अपेक्षा येणारे दिवस आपले असतील शिवसैनिकांना जपा येणारे राजकीय व रस्त्यावरची लढाई शिवसेनेला जिंकायची आहे.असे बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव असे म्हणाले.तसेच पक्षप्रमुख उद्धव साहेबांना दिलेला त्रास तमाम जनतेसमोर मांडा असा आदेशही संपर्कप्रमुख जाधव यांनी शिवसैनिकांना दिला.
यावेळी माजी राज्य मंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव,माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, मा.नगरसेवक योगेश क्षीरसागर, संभाजीनगर म.न.पा.चे सभापती राजू वैद्य, महिला आघाडी जिल्हा संघटक संगीता चव्हाण, युवासेना जिल्हा युवा अधिकारी सागर बहिर, शिव सहकार सेना जिल्हा संघटक पंकज कुटे किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवासेना व अंगीकृत संघटनेचे सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, उप शहर प्रमुख आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.