अध्यक्ष पदी गणेश मैड तर सचिव पदी सचिन रासने यांची निवड
By MahaTimes ऑनलाइन | बीड
येथील सुभाष रोड असोसिएशन ची वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच पार पार पडली. अध्यक्ष दिपक कर्नावट, जिवन जोगदंड, सूर्यकांत महाजन व कोषाध्यक्ष मदन काबरा यांच्या उपस्थितीत पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष पदी गणेश मैड तर सचिव पदी सचिन रासने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीमध्ये सुभाष रोड असोसिएशन च्या मागील तीन वर्षाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कोषाध्यक्ष मदन काबरा असोशिएशनच्या खर्चाचा लेखाजोखा मांडला व यास सर्वानुमते संमती देण्यात आली. या सभेत कांही महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यात सुभाष रोडच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र सानप यांच्या सूचनेवरून माळीवेस ते साठे चौक दरम्यान सीसीटीव्ही लावण्यावर चर्चा होऊन त्यावर सर्व व्यापारी बांधवांनी संमती दर्शविली वलवकरच सुभाष रोड व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने साठे चौक ते माळीवेस दरम्यान सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
या बैठकीस दीपक कर्नावट, सूर्यकांत महाजन, राजेंद्र मुनोत, जीवन जोगदंड यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस सुभाष रोडचे सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक दीपक कर्नावट यांनी मानले. सूत्र संचालन सूर्यकांत महाजन यांनी तर आभार प्रदर्शन जीवन जोगदंड यांनी केले. नूतन अध्यक्ष व सचिव यांनी मनोगत व्यक्त केले व निवडीबद्दल सर्व व्यापारी बांधवांचे आभार मानले.
नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य
अध्यक्ष- गणेश मैड, सचिव- सचिन रासने, उपाध्यक्ष- निलेश ललवाणी व सुहास मुणोत, सहसचिव संदीप रेवनवार व पवन दहिवाळ, वितरण कमिटीचे चेअरमन जीवन जोगदंड, दिपक कर्नावट, सूर्यकांत महाजन, कोषाध्यक्ष- मदन काबरा तर सदस्य म्हणून प्रवीण पटेल, सतीश घोडके, ओमकार शिंदे, किरण सोळंके यांची निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला.