ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु …महाराष्ट्रातील विधान सभा बरखास्तीच्या दिशेने..
By MahaTimes ऑनलाइन | बीड
एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेना सोडणार नसल्याचं रात्री दिलेल्या प्रतिक्रि येत पुन्हा म्हटलं आहे. मात्र माझ्याकडे जो आमदारांचा गट आहे, तीच खरी शिवसेना आहे, असं ठसवून त्यांनी सांगितलं आहे. शिंदेंच्या या वक्तव्यामुळे त्यांची पुढील रणनीती काय आहे, याचे अंदाज लावले जात आहेत. बंडखोर नेते शिंदे भाजपसोबत सत्तास्थापन करतील की हा दबावगट तयार करून मागण्या मंजूर करु न घेण्याचा प्रयत्न? आहे असा ही कयास लावला जात आहे. एकनाथ शिंदे आज दुपारी 3 वाजेपर्यंत गुवाहटीतून मुंबईत पोहोचतील. दुपारी ते राज्यपालांची भेट घेतील आणि भाजपसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या पाठिंब्याने सुरु असलेली ही रणनिती यशस्वी झाली तर ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालंय, असं म्हणावं लागेल.
तर दूसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते त्यांना डावलण्यात आल्याने ने ते तेव्हापासुन नाराज होते. भाजपासोबत अंतर्गत मैत्री त्यांनी कांही कमी होउ दिली नाही. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा व विधानपरीषद निवडणूकीतून महाविकास आघाडीला जे धक्के बसलेत त्यात एकनाथ शिंदे यांचाच हाथ होता हे आता अधोरेखीत झाले आहे.
हे सरकार टिकणार की जाणार?
हे सरकार टिकण्याची शक्यता खूप कमी दिसतेय. याचं साध कारण म्हणजे साधारण 36 (शिवसेना 33 व अपक्ष 3 ) असा आमदारांसोबत एकनाथ शिंदेंचा एक गट मोठा गट दिसतोय. जर हे 30 आमदार एकत्र मागणी करत आहेत की आपण सगळे मिळून भाजपसोबत जाऊ आण ितुम्ही आला नाहीत तर आम्ही भाजपसोबत जाऊ, अशा परिस्थितीत हे सरकार राहील याची शक्यता खूपच कमी आहे. पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत. कारण पुढच्या काही तासातच उद्धव ठाकरे आपल्या आमदारांची मनधरणी करतात का, शरद पवार काही करतात का, हे सगळं पाहायला मिळले. महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. सध्याच्या स्वरु पात हे सरकार टिकेल याची शक्यता फार कमी आहे.
दबावगट तयार करून मागण्या मंजूर करु न घेण्याचा प्रयत्न?
एकनाथ शिंदेच्या ट्वीटवरून असं लक्षात येतं की शिवसेना सोडण्याचे संकेत त्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे ते शिवसेनेतच राहून अंतर्गत दबावगट तयार करतील, अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरेंना सांगून ते आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. सत्तेसाठी प्रतारणा करणार नाही, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. याचे अनेक अर्थ निघू शकतात. एक म्हणजे मी जे काही करतोय ते सत्तेसाठी करत नाहीय. मात्र दूसरीकडे ज्या वेगवान घडामोडी घडत आहेत त्यावरून असं म्हटलं जातंय की कदाचित एकनाथ शिंदे भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करतील. मात्र, ट्वीटमध्ये त्यांनी तीन वेळा बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख केलाय तर एकदा आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख केलाय. पण, उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची नाराजी उद्धव ठाकरेंविरोधात आहे, असं म्हणता येईल.
महाराष्ट्रातील विधान सभा बरखास्तीच्या दिशेने..
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री या बैठकीसाठी जमा होत आहेत. तत्पूर्वी काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली आहे. तर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही भेटून या स्थितीवर चर्चा केली. काँग्रेसच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी आम्हाला कोणीही प्रलोभन देऊ शकत नाही काँग्रेसचे आमदार एकत्र आहेत. असं सांगितलं.
शिंदेसमर्थक आमदार
1- प्रताप सरनाईक (माजिवडा, ठाणे)
2- श्रीनिवास वनगा (पालघर)
3- अनिल बाबर (खानापूर)
4- नितिन देशमुख (अकोला)
5-लता सोनवणे (चोपडा)
6- यामिनी जाधव (भायखळा)
7- संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)
8- महेंद्र दळवी (अलिबाग)
9- भारत गोगवले (महाड)
10- प्रकाश सर्वे (मागाठणे)
11- सुहास कांदे (नांदगाव)
12- बच्चू कडू , प्रहार पार्टी (अचलपूर)
13- नरेन्द्र बोंडेकर, अपक्ष (भंडारा)
14- संजय गायकवाड (बुलडाणा)
15- संजय रायमूलकर (मेहेकर)
16- बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
17- रमेश बोरनारे (वैजापूर)
18- चिमणराव पाटील (एरंडोल)
19- किशोर पाटील (पाचोरा)
20- नितीनकुमार तळे (बाळापूर)
21- संदीपान बुमरे (पैठण)
22- महेंद्र थोरवे (कर्जत)
23- शंभूराजे देसाई (पाटण)
24- शहाजी पवार
25- तानाजी सावंत (परांडा)
26- शांताराम मोरे (भिवंडी)
27- विश्वनाथ भोईर (कल्याण)
28- शहाजी पाटील
29-प्रदीप जैसवाल
30-किशोर पाटील
31-उदयसंह राजपूत
(शिवसेने चे अन्य तीन व अपक्ष तीन असे एकुण 36 आमदारांचा गट)