“कुर्हाडीचा दांडा गोतास काळ” ! आपल्याच लोकांना मी नकोय हे माझ्यासाठी जास्त क्लेशदायक
By MahaTimes ऑनलाइन | मुंबई
मला खुर्चीचा कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. बंडखोरांनी सांगावं, राजीनामा देण्यास तयार आहे. येवढेच नव्हे तर, शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. आता काही आमदार गायब झाले आहेत. काही आमदारांचे फोन येतात. काल परवा विधानपरिषदेची निवडणुक झाली. तेव्हा हॉटेलमध्ये गेलो तेव्हा बोललो ही कुठली लोकशाही. शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका, हे असलं राजकारण मला नकोय. या फेसबुक लाइव्हनंतर एकनाथ शिंदेंच्या निर्णयात काही बदल होतो याकडे सा-या देशाचे लक्ष लागुन आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह येत जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी जनतेशी भावनिक साद घातली. तुम्ही मुख्यमंत्री नको, असं राष्ट्रवादी वा काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं असतं तर एकवेळ ठीक होतं. परंतू आपल्याच लोकांना मी मुख्यमंत्री नकोय हे माझ्यासाठी जास्त क्लेशदायक आहे. सध्याची परिस्थिती म्हणजे कुर्हाडीचा दांडा, गोत्यास काळ. कुर्हाडीच्या घावांच्या वेदना होत नाहीत. मात्र या कुर्हाडीचा दांडा झाडापासून तयार केलायच याचं जास्त वाईट वाटतं, असं म्हणत ते भाविनक झाले.
मुख्यमंत्रिपद हे माझ्याकडे अनपक्षितपणे आलं. शरद पवारांनी माङयावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी टाकली होती. मला त्यावेळी कोणताही अनुभव नव्हता. तरीही मी ती जबाबदारी घेतली आणि नेटाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आणि हिंदूत्व कधीही वेगळं होऊ शकत नाही. हिंदुत्वासाठी कोणी काय काय केलंय हे आताही बोलण्याची वेळ नाही. हिंदुत्वाविषयी बोलणारा मी विधीमंडळातील पहिला नेता असेन.
एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. असेआवाहन ही श्री. ठाकरे यांनी केले. एकुणच उद्धव ठाकरे सरकार अल्पमतामध्ये आल्याचं अधोरेखित झालंय. आता पुढे काय घडामोडी होतात याकडे पुर्ण देशाचे लक्ष लागुन आहे.