97.20 टक्के निकाल, मुलींची मुलांवर बाजी
By MahaTimes ऑनलाइन | बीड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. 97.20 टक्क्यांसह बीड औरंगाबाद विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. यंदा 40 हजार 908 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षा दिली त्यापैकी 39 हजार 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला 40 हजार 908 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 39 हजार 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 22 हजार 629 मुले उत्तीर्ण झाली असून त्यांची टक्केवारी 96.61 इतकी आहे. तर, 16 हजार 575 मुली यशस्वी झाल्या असून त्यांची टक्केवारी 98.02 आहे.
बीड जिल्ह्याने ssc result औरंगाबाद विभागात अव्वल स्थान पटकावत सर्वांनाच मागे टाकले आहे. जिल्ह्यातील एकूण 280 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 90 टक्क्यांपेक्षा जास्त निकाल लागलेल्या असंख्य शाळा आहेत.
बीड जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल
- बीड – 97.57
- पाटोदा – 97.55
- आष्टी – 97.43
- गेवराई – 97.55
- माजलगाव – 96.03
- अंबाजोगाई – 97.37
- केज – 97.10
- परळी – 96.85
- धारूर – 95.45
- शिरूर – 96.93
- वडवणी – 97.84
राज्याचा निकाल 96.94 टक्के निकाल
इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातीलएकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा कोकण विभागाची बाजी तर नाशिक विभाग सर्वात शेवटी असल्याचं समोर आलं आहे. कोकण विभागाचा निकाल 99.27 टक्के तर नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका लागला आहे.या निकालात नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला आहे. राज्यात इयत्ता बारावीनंतर दहावीतही कोकणचा निकाल सर्वाधिक निकाल लागला आहे. राज्यातील 12 हजार 210 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याशिवाय 66 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला.