कोठे, काय वाचा सविस्तर…
By MahaTimes ऑनलाइन | बीड
आजच्या घडीत 110 रूपए दराने पेट्रोल मिळाला तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा होईल. मात्र, आपणास 54 रुपयात 1 लिटर पेट्रोल मिळणार असे कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर View Location मंगळवारी (दि. 14) सकाळी 8 ते 9 वाजे दरम्यान अवघ्या 54 रुपयात एक लिटर पेट्रोल देण्यात येणार आहे.

ही भन्नाट सूट महाराष्ट्र नव निर्माण सेना (मनसे) चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसे कडून देण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये उद्या अवघ्या Rs.54 रुपयात एक लिटर पेट्रोल मिळणार आहे. विशेष म्हणजे हे पेट्रोल मनसेकडून मिळणार आहे.

मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले, राज ठाकरे यांचा उद्या 54 वा वाढदिवस आहे. यानिमित्त प्रत्येकी 1 लिटर पेट्रोल 54 रुपये लिटरने दिले जाणार आहे. कमी किमतीत पेट्रोल घेण्यासाठी मोठी गर्दी होण्याची सुद्धा शक्यता ही त्यांनी वर्तविली आहे.
