शिवसंग्राम हा भाजपचा घटक पक्ष असुन कायम सोबत राहणार – विनायकराव मेटे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
By MahaTimes ऑनलाइन | बीड
आ.विनायकराव मेटे साहेबांनी धनगर समाजातील सामाजिक योगदान देणार्या विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वाचा गुणगौरव केला ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रभर आम्ही नेहमीच आ विनायक मेटे यांच्या सोबत असतो, भविष्यातही राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप उगवता सूर्य असून, जनतेचा मा.ना.देवेंद्र फडणवीस साहेबावर विश्वास आहे. मेटे साहेबासाठी, देवेंद्रजींची दरवाजे सदैव खुले असतात ते अखंड महाराष्ट्राने पाहिलेला आहे. तुम्ही संयम बाळगा, भविष्यात तुम्हाला भाजप आाण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निश्चित न्याय मिळेल असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिवसंग्रामच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखिनय कामिगरी करणार्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायकराव मेटे, जय मल्हार फेम ईशा केसकर, भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष किसन दादा कदम, रामदास नाईकवाडे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे, बीड शहराध्यक्ष अँड.राहुल मस्के, महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अशोक तावरे, मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक भानुदासजी जाधव,(सी.ए), युवा उद्योजक संजयजी पवार, ऊसतोड कामगार नेते बबन माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनिषाताई कुपकर, बीड शहराध्यक्षा अँड.पुजाताई शहाणे, मनिषाताई कोकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आ.विनायकराव मेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बीड जिल्ह्याचा विचार केला असता ओबीसी नेते हे फक्त येथील सर्वसामान्य जनतेचा राजकारणासाठी वापर केला. बीड जिल्ह्यातील ओबीसींचा फक्त राजकारणासाठी आण व मतासाठी वापर करून घेतला. ओबीसींच्या प्रश्नावर त्यांनी कधीही आवाज उठवला नाही. त्यांनी फक्त त्यांचे नातेवाईक मोठे केले. फक्त नातेवाईकांचा विकास म्हणजे ओबीसी समाजाचा विकास नव्हे असेही त्यांनी भाषणात म्हटले. राज्य सरकारने महाराष्ट्रातील मराठा, मुस्लिम, ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. मराठा आरक्षण घातलं, ओबीसींच्या राजकीय आरक्षण घातलं, म्हणून आज सर्वसामान्य जनतेचा या राज्यसरकार वरील विश्वास उडत आहे. शिवसंग्रामची लढाई ही प्रस्थापितां विरुद्ध विस्थापिताची लढाई आहे. विस्थापितांना संधी देणारा पक्ष म्हणून शिवसंग्रामची ओळख आहे. विधानपरिषदेचा तिकीट कापल्यानंतर काही लोकांना असुरी आनंद झाला पण त्यांचा आनंद जास्त काळ टिकणार नाही. शिवसंग्राम हा भाजपचा घटक पक्ष असुन कायम सोबत राहणार आहे. भविष्यात ही त्यांच्या बरोबरीने काम करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी युवक आघाडीचे प्रभारी प्रा. सुभाष जाधव, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय माने, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष फेरोज पठाण, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, राज्य परिवहन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिच्छंद्र कुटे, सोशल मीडिया बीड जिल्हाध्यक्ष प्रा.पंडित शेंडगे, युवक जिल्हा सरचिटणीस गणेश खांडेकर, युवक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस कृष्णा परजणे माजी नगरसेवक दत्ता गायकवाड,शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे, युवा नेते मनोज जाधव, युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले,युवक शहर उपाध्यक्ष अनिकेत देशपांडे,कैलास शेजाळ, महिला आघाडी गेवराई तालुका अध्यक्षा साधनाताई दातखीळ, माजी पं.स.सभापती मनिषाताई बीड तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, गेवराई तालुका अध्यक्ष कैलास माने, आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, पाटोदा तालुका अध्यक्ष सुशील तांबे, शिरूर कासार तालुका अध्यक्ष माऊली शिंदे, माजलगाव तालुका अध्यक्ष उत्तम पवार, केज तालुका अध्यक्ष नामदेव गायकवाड, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष धणेश गोरे, वडवणी तालुका अध्यक्ष सुग्रीव मुंडे,पंचायत समतिी सदस्य ज्ञानेश्वर कोकाटे, बीड तालुका सचिव शेख कुतुब भाई, राहुल बनगर, नांदुर घाट सर्कल प्रभारी आनंद जाधव, केस युवक तालुकाध्यक्ष अमोल पोपळे, सोशल मीडिया केज तालुका अध्यक्ष दीपक कोल्हे, अल्पसंख्याक आघाडीचे बीड शहराध्यक्ष अमजद पठाण, बीड तालुका उपप्रमुख राजेंद्र माने, सुनील कुटे, ओबीसी आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष बंडू बापू शहाणे, भटक्या विमुक्त आघाडीचे तालुका अध्यक्ष हनुमंत पवार, ओबीसी आघाडीचे गेवराई तालुका अध्यक्ष रमेश राठोड, युवक आघाडी बीड तालुका अध्यक्ष गणेश साबळे, युवक आघाडी बीड तालुका उपाध्यक्ष मधुकर हाटवटे, केज शहराध्यक्ष अशोक कदम, शिरूर तालुका उपाध्यक्ष नामदेव धांडे, सुभाष काकडे, ओबीसी सेलचे शिरूर तालुकाध्यक्ष शिवराम राऊत, शिरूर कासार तालुका सरचिटणीस माऊली परजने, युवक तालुकाध्यक्ष अशोक भोकरे, युवक आघाडी शिरूर तालुका उपाध्यक्ष अनिल उगले, युवक आघाडी सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, पाडळी गट प्रभारी दत्ता काका इंगळे, भीमराव मिसाळ माऊली शिरसाट,दत्ता काका इंगळे, माऊली शिरसट, रायमोह गटप्रभारी संदीप येवले, मातोरीचे गट प्रभारी ज्ञानेश पानसंबळ,अल्पसंख्याक नेते शेखअखिल भाई, शेखअजहर, शेख आबेद, नदीम गणे, शेख लालाभाई, इमरान जागीरदार,अख्तर पेंटर, सादिक पठाण, शिवसंग्राम नेते मुकुंद गोरे, गालफाडे साहेब, सुरेश बावळे, अशोक लोकरे, परशुराम गायकवाड राजेंद्र बिहर, हरिश्चंद्र ठोसर यांच्यासह सर्व गटप्रमुख गणप्रमुख व शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते व धनगर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.