कोणत्याही धर्माचा अपमान करणा-या व्यक्तींविरूध्द कार्यवाहीसाठी यूएपीए, एनएसए सारखा कायदा करा
By MahaTimes ऑनलाइन | बीड
जगतगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात तात्काळ कार्यवाही करून अटक करा. या मागणीसाठी अखिल भारतीय इमाम काउंसिल ने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी, बीड कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
अखिल भारतीय इमाम परिषदेचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुफ्ती मोहम्मद आसिफ कासमी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत.सरकार ने तमाम मुस्लिम बांधवांच्या भावना लक्ष्यात घेउन नुपूर शर्मा यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून अटक करा अशी मागणी केली.
दरम्यान अखिल भारतीय इमाम काउंसिलच्यावतीने जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमुद केले आहे की, पैगंबरांचा अवमान करणा-या नुपूर शर्मा यांच्याविरूध्द तात्काळ कारवाई करून अटक करा, कोणत्याही धर्माचा अपमान करणा-या व्यक्तींविरूध्द कार्यवाही करण्यासाठी यूएपीए, एनएसए सारखा कायदा करा.
देशातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भाजप, आरएसएस संघटनेला लगाम घालावा. भारत सरकारने नुपूर शर्मा यांच्याविरूध्द भादंवि कलम 153 ए, 153 ब, 295 ए, 298 व 505 अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निदर्शने आंदोलनात अखिल भारतीय इमाम परिषदेचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती आसिफ साहेब, हाफेज इरफान साहेब, हाफेज फसीयोद्दीन साहेब, हाफेज जमील अली साहेब, मौलाना सुफियान साहेब आदि सह असंख्य मुस्लिम बांधव सहभागी झाले.