जवळपास सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
By MahaTimes ऑनलाइन | पुणे
12 वी बोर्ड परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला. नर्हे धायरी येथील कर्मवीर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड सायन्स चा 100 टक्के निकाल लागला आहे. जवळपास सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.

कर्मवीर कॉलेज मधुन समीन ईश्वरराव धामनशेट्टी हा सायन्स ( Science ) शाखे चा विद्यार्थी 93.17 टक्के गुण मिळवुन कॉलेज मधुन सर्व प्रथम आला. अथर्वन मनोज पोहनेरकर हा विद्यार्थी 92.17 टक्के गुण मिळवुन सर्व द्वितीय व अथर्व नारायण म्हस्के हा 90.33 टक्के मार्क्सर् मिळवुन सर्व तृतीय आला आहे.
कॉमर्स शाखेतुन अमित प्रशांत शिंदे हा विद्यार्थी 85.50 टक्के गुण मिळवुन कॉलेज मधुन प्रथम आला आहे. श्रावणी श्रीपती बिरादे हि विद्यार्थीनी 83.83 टक्के गुण मिळवुन द्वितीय; नेहा हरिशचंद्र गौड हि विद्यार्थीनी 81.50 टक्के गुण मिळवुन तृतीय आली आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था प्रमुख मा. श्री मदन जाधव सर, संस्थे चे मार्गदर्शक मा.श्री डी.एस. कुलकर्णी सर, कॉलेज प्रिन्सिपल श्री भालचंद्र देशमुख तसेच प्रा.अनुप्रिया मॅडम, प्रियांका मॅडम, सारिका फडके मॅडम, गुणोत्तमा मॅडम व सर्व लेक्चर व स्टाफ यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक उपक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कर्मवीर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड सायन्स नर्हे धायरी चा100 टक्के निकाल लागला आहे. जवळपास सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. अध्ययन, अध्यापन व पालकांचे सहकार्य या त्रिवेणी संगमामुळे हे शक्य झाले आहे. कोणताही अभ्यास करत असताना योग्य दिशा ठरवून व वेळेचे नियोजन करून परिश्रम केल्यास हमखास यश मिळते. यशाचे शिखर नक्कीच गाठता येते म्हणून विद्यार्थ्यांनी आपला वेळ व्यर्थ वाया न घालवता ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला सर्वस्वी झोकून दिले पाहिजे. असे मनोगत मा. प्राचार्य डी.एस.कुलकर्णी सरांनी व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक उपक्र मास शुभेच्छा दिल्या.
