By MahaTimes ऑनलाइन | बीड
गेल्या दीड महिन्यापासून बीडच्या रिक्त असलेल्या पोलीस अधिक्षकपदी अखेर नियमित स्वरुपात नियुक्ती करण्यात आली आहे. नंदकुमार ठाकूर हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक असतील. आता, नंदकुमार ठाकूर येत्या दोन दिवसात पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत.

राज्याच्या गृहविभागाने बुधवारी सायंकाळी चार जेष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले, ज्यात नांदेड येथील मानवी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक, नंदकुमार ठाकूर यांची बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांची बदली झाल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक पद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त होते. दरम्यान, अधीक्षक सुनील लांजेवार हे प्रभारी राहिले. दरम्यान, पंकज देशमुख यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
आता, नंदकुमार ठाकूर हे येत्या दोन दिवसांत बीडच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बीडमधील कायदा व सुव्यवस्थ सुधारण्याची जबाबदारी आता नव्या एसपींच्या खांद्यावर असणार आहे.