हरीत अंबाजोगाई ग्रुप तर्फे 21 झाडांचे वृक्षारोपण
By MahaTimes ऑनलाइन | बीड
आज दिनांक 05 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिना निमित्त हरीत अंबाजोगाई ग्रुप तर्फे, कृष्ण मंदीर परिसर, प्रशांत नगर, अंबाजोगाई येथे 21 झाडांचे वृक्षारोपण करून यावर्षीच्या वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली.

सदरील गृप मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून आजपर्यंत पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. यामध्ये अंबाजोगाई येथील विविध भागात जसे की, मुकूंदराज परिसर, खोलेश्वर मंदीर परिसर, नागनाथ मंदीर परिसर योगेश्वरी मंदीर परिसर, संत सावता माळी परिसर, प्रशांत नगर, अंबिका वसाहत, आनंद नगर, योगेश्वरी महाविद्यालय परिसर, गोदावरीबाई कुंकूलोळ शाळा परिसर, अण्णाभाऊ साठे चौक ते भगवान बाबा चौक परिसर, इतर भाग या भागात वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करण्यात आले. अंबाजोगाई शहरातील वृक्षगणना करण्यात आली.
ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम
मुकुंदराज परीसरातील पक्ष्यांसाठीचे पाणवठे भरण्यात येतात. पक्षांना चारा टाकण्यात येतो. शालेय विद्यार्थी साठी पर्यावरण पूरक गणेश मुर्ती बनवणे व मिट माय ट्री- रील अशा स्पर्धा घेण्यात आया. दासोपंत परिसरातील बारव ची स्वच्छता करून गाळ काढण्याचे काम करण्यात आले. मुकुंदराज परिसर, हत्तीखाणा परिसर, आम्लेश्वर मंदीर परिसर या ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्या. अशी माहिती हरीत अंबाजोगाई ग्रुप तर्फे देण्यात आली.

हरीत अंबाजोगाई ग्रुप तर्फे आजच्या वृक्षारोपण उपक्रमास विशाल जगताप, कमलेश परधडीया, अनंत मलवाड, प्रा. राजकुमार थोरात, गंगासागर बुरांडे, गुरुदत्त तिवारी, शैलजा पवार, रेणुका गिरवलकर, प्रशांत पाटील, सूरज पवार, अजिंक्य कुलकर्णी, अनंत गाणोरकर, गौरव वाघमारे, बालाजी साखरे, दुर्गेश परदेशी, राजविर मेहता, सोहन कदम, गणेश पवार, गणेश सोनवअशी वृक्षारोपणात उत्साहात सहभाग नोंदविला.
