बीड तालुक्यातील रंजेगाव येथील खळबळजनक घटना, पोलिसांनी पतीला घेतले ताब्यात
By MahaTimes ऑनलाइन | बीड
एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना 5 जून रोजी पहाटे दोन वाजता बीड तालुक्यातील रंजेगाव येथे उघडकीस आली आहे. दरम्यान, चोराने आपल्याला बांधून ठेवले असा दावा करणाऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार बीड तालुक्यातील रंजेगाव येथील ज्योती दिनेश आबुज ( वय 29) असे मयत मिहलेचे नाव आहे. 12 वर्षा पूर्वी ज्योति चा विवाह रंजेगाव येथील दिनेश उर्फ विश्वंभर पांडुरंग आबुज ( वय 35 ) याच्याशी झाला होता. काल रात्री दिनेश हा पत्नी व दोन मुलांसह घरात होते. पतीच्या मोबाईलचे फिंगर प्रिंट लॉक पत्नीने उघडताच त्यावर दिसुन आलेल्या चॅटींग वरून पती – पत्नीमध्ये काल रात्री कडाक्याचे भांडण झाले. सदरील प्रकरणानंतर पहाटेच्या सुमारास पतीने कथित स्वरूपात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रंजेगाव ( ता.बीड ) येथे घडली. दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसुन पत्नीला विवस्त्र करून तिचा खुन केला आणि मला दरवाज्याजवळ बांधुन टाकले असा खुलासा करत पतीने चक्क दरोड्याचा बनाव केला. मात्र चोराने बांधुन ठेवल्याचा दावा करणाऱ्या पतीला ताब्यात घेवून ला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पत्नीच्या खूनाची कबुली दिली.
दरम्यान पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी ही घटनास्थळी भेट दिली. उप अधीक्षक संतोष वाळके यांच्यासह पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक उपनिरीक्षक एम. एन. ढाकणे तसेच गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रु ग्णालयात पाठविला. काही तासाच्या आतच या प्रकरणातील बनाव उघडा पाडला. याप्रकरणी पिंपळनेर ठाण्यात गुन्हयाची नोंद झाली आहे.
