यशस्वी 11 विद्यार्थ्यांचा संस्थेकडून गौरव
By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड शहरात कमी कालावधित नावलौकिक मिळालेली आझाद हिंद सेमी इंग्लिश उर्दू शाळेने पिपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित बीड टॅलेंट सर्च अॅकाडमी परिक्षेत आकरा मुलांनी घवघवीत यश संपादित केले आहे.
या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या शेख आयेशा, शेख अनस, सय्यद हूरैन, हाश्मी बुशरा, तांबोळी रेहान, शेख महंमद कैफ, शेख सुलेमान, सय्यद लायबा, शेख सदफ, सय्यद रूखय्या व सय्यद मारीया या विद्याथ्यार््ंचा आझाद हिंद संस्थेचे सह सचिव फैसल शेख, सय्यद आवेज, शेख रज्जाक, यास्मीन शेख, सय्यदा फिरदोस, मोमीन तरन्नुम, सबा यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी मुलांचे पालक उपस्थित होते.
सदर परिक्षेत बीड शहरातील 34 शाळेतील 1200 मुलांनी सहभाग घेतला होता. या पुढेही शाळेतर्फे एन टी एस, नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेची तैयारी नियमीत करून घेण्यात येणार असा संकल्प शाळेने केला आहे.