राष्ट्रवादी आपल्यादारी अभियानसह मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर, वृक्षारोपन आदी कार्यक्रम उत्साहात
By MahaTimes ऑनलाइन | बीड
माजी आमदार अमरसिंह पंडित याच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरामध्ये समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णाई येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर, अवयव दान संकल्प मोहिम, राष्ट्रवादी आपल्यादारी अभियान यासह वृक्षारोपन आदी कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले नेत्र तपासणी शिबीरासह अवयव दान संकल्प मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी आपल्यादारी या अभियानाचा शुभारंभ यावेळी विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने कृष्णाई येथे अवयव दान संकल्प मोहिम राबविण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सौ. प्रज्ञाताई खोसरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, महिला आघाडीच्या कमलताई निंबाळकर, सौ. संगिताताई तुपसागर, श्रीमती शाहिनभाभी पठाण, अवयव दान विभागाचे समुपदेशक अशोक मते, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ. मुक्ताताई आर्दड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमरसिंह पंडित यांचा नेत्रदान संकल्प असलेला अर्ज अवयव दान विभागाचे समुपदेशक अशोम मते यांच्याकडे विजयसिंह पंडित यांच्या हस्ते सुर्पूद करण्यात आला. या कार्यक्रामात मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केलेले मसु शिवाजी गायकवाड, पुर्ण अवयव दान संकल्प केलेले उत्तम सोलाने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ. मुक्ताताई आर्दड यांनी कार्यक्रम आयोजन करण्या मागची भुमिका विषद केली. रणविर पंडित यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेत्रदान करण्याचा संकल्प केला याची प्रेरणा घेवुन आपण अवयव दान संकल्प मोहिम आयोजित केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सौ. प्रज्ञाताई खोसरे, आनंद सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने ई-श्रम कार्ड नोंदणीचा विजयसिंह पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाकर कापसे यांना ई-श्रम कार्डाचे वितरण करण्यात आले. अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल येथील संजय घाडगे यांनी नेरे ता. पनवेल येथील स्नेहकुंज आधार येथे अन्नदान वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जि.प.सदस्य विलास फडके, पनवेल बाजार समितीचे संचालक संतोष पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दर्शनसेठ ठाकुर, कार्याध्यक्ष पिंगळे, युवकचे अध्यक्ष मोरेश्वर पाटील, प्रकाश घाडगे, आधारगृहाचे नितीन जोशी, प्रमोद घरत, महादेव गडगे, राजेश मडवी, वैभव ठाकुर आदी उपस्थित होते.

शिवशारदा मल्टीस्टेट च्या वतीने सिरसदेवी येथे वृक्षारोपन करण्यात आले यावेळी अॅड. रावसाहेब रुचके, दत्तात्रय निकम, मनोहर गाडे, राजाभाऊ कदम, राजाभाऊ डोळस, सुर्यकांत भोगे, भरत कदम आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सलीम यांनी टाकरवण येथे गरजु महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सुनिल तौर, संतोष खोमाड, महादेव कदम, आसाराम भुंबे, सतिष राठोड आदी उपस्थित होते. औषधनिर्माणशास्त्र संस्थेच्या वतीने गढी येथे वृक्षारोपन करण्यात आले.
वाढदिवसाच्या औचित्याने राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये शिवप्रतिमा रेखाटण्याचा विश्वविक्रम केल्याबद्दल चित्रकार उद्देश पघळ यांचा विजयसिंह पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आनंद सुतार, प्रविण राऊत, गुफरान इनामदार, सुदाम पवार यांनी आयोजित केलेल्या साहेब चषक या डे-नाईट क्रिकेट स्पर्धेतील विजेता ए.एम. क्रिेकेट संघाला १०३३३३ रु. तर उपविजेता मौलाना आझाद क्रिेकट संघाला ५१३३३ रुपयांचे पारितोषिक विजयसिंह पंडित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
