13 बांधकाम मजुरांची केली मोफत आरोग्य तपासणी
By MahaTimes ऑनलाइन | बीड
अत्तार वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने 12 मे रोजी बांधकाम मजुरांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरातील मजूरांची 13 प्रकारची तपासणी करून लाभार्थ्यांना 27 मे रोजी रिपोर्ट कार्ड चे वाटप करण्यात आले.
अत्तार वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने नेहमी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग 12 मे रोजी बांधकाम मजुरांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. राज्यातील बांधकाम कामगार यांना विविध बांधकाम संबधी साहित्य पुरवठा केला जातो. त्याच प्रमाणे बांधकाम कामगार यांच्या आरोग्याची ही काळजी घेण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. या अनुशंगाने अत्तार वेल्फेअर ट्रस्ट आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा 13 बांधकाम कामगारांनी लाभ घेतला.
दरम्यान शिबिरात सहभागी मजूरांची ऑडियन स्क्रीनिंग टेस्ट, दृष्टी स्क्रीनिंग चाचणी, सी.बी.सी. चाचणी, रक्तातील साखरेची चाचणी, यकृत कार्य चाचण्या, रेनल (मूत्रपिंड) कार्य चाचण्या, प्रोफाइल, मलेरिया परजिवी, सिरम लोह, मॅग्नेशियम अशा तेरा प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या पूर्णपणे मोफत केल्या गेल्या. या सर्व चाचण्यांचा टेस्ट रिपोर्ट 15 दिवसांनी प्राप्त होत असतो. या रिपोर्टचे वाटप 27 मे रोजी करण्यात आले. याप्रसंगी खलील भैय्या पटेल (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस, माजलगांव ), अकबर अत्तार (जनरल सेक्रेटरी अत्तार वेलफेयर ट्रस्ट), शाकेर अत्तार, उपाध्यक्ष, अमजद अत्तार, गयास अत्तार, युनियनचे अध्यक्ष मोहम्मद सलीम अत्तार, खलील पेंटर, अत्तार जावेद भाई, मिस्त्री परवेज अत्तार, मौलाना तारिक अनवर अशरफी, सरफराज अत्तार, अयान अत्तार आदींची उपस्थिती होती.