आरोपीने तपासाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न केला ; खुनाचे सत्र पुढे चालू ठेवण्याचा दिला होता इशारा
By MahaTimes ऑनलाइन | बीड
पोलीस ठाणे शिरु र हद्दीत आनंदगाव शिवारात दिनांक 6 मे रोजीचे मध्यरात्री कुंडलीक सुखदेव विघ्ने (65, रा. आनंदगांव ता.शिरु र कासार) हे त्याचे शेतातील जनावरांचे राखनीसाठी झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरु न त्यांचे छातीवर धारधार शस्त्राने मारु न खुन केला होता. तसेच घटनेच्या आदल्या दिवशी 5 मे रोजीचे मध्यरात्री खांबा लिंबा गावाचे शिवारात इसम नामे नारायण गणपती सोनवणे (65,रा.खांबा लिंबा ता.शिरु र कासार हे त्यांचे राहते घरासमोर झोपलेले असताना अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरु न चेहर्यावर धारदार शस्त्राने वार करु न जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वरील दोन्ही घटनेच्या ठिकाणी दोन-दोन चिठृया मिळून आल्या होत्या. त्यामध्ये आरोपीने पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी दूसर्याच इसमांचे नावे टाकून त्यांना अटक न केल्यास खुनाचे सत्र पुढे असेच चालू राहील असे पोलीसांना आव्हान करु न तपासाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न केला होता. सदरचे दोन्हीही गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे.

सदर दोन्ही घटनेच्या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यावरु न पो.नि. स्था.गु.शा.यांनी दोन वेगवेगळे पथके तयार करु न जिल्हयातील व लगतच्या जिल्हयातील वेगवेगळया गुन्हेगारवस्त्या चेक करीत असतांना पो.नि.स्था.गु.शा. यांना गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली की, आनंदगांव शिवारातील केलेल्या इसमाचा खुन हा सरकल्या उर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण (रा.तागडगांव शिवार ता.शिरु र कासार) याने केला असल्याची खात्रीलायक माहिती मिळालेवरु न स्था.गु.शा.चे दोन पथके त्याचे मागावर असतांना तो बीडकीन (ता.पैठण जि.औरंगाबाद) भागात गेल्याची माहिती मिळाल्याने त्याचा बीडकीन भागात शोध घेतला.
परंतू तेथूनही तो पसार होवून वर्धा जिल्हयात पुजाई गावात गेल्याची माहिती मिळाल्याने दोन्हीही पथके सदर ठिकाणी पुजाई गावाचे शिवारात शोध घेत असतांना त्याला पोलीसांची चाहूल लागल्याने तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना सरकल्या उर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण यास एक ते दीड किलोमिटर पाठलाग करु न ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केला असता त्याने सदरचे दोन्हीही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
त्यास आज रोजी पोलीस ठाणे, शिरु र कासार गु.र.नं. 50/2022 कलम 302 भादंविमध्ये अटक करु न पुढील तपास पो.नि. पो.स्टे.शिरु र हे करीत आहेत. सदर आरोपी याने सदरचे गुन्हे का केले? त्याचे साथीदार कोण आहेत? गुन्हयात कोणत्या हत्याराचा वापर केला? अशा विविध बाबींचा तपास सुरु आहे. ही कारवाई एसपी पंकज देशमुख, एएसपी सुनील लांजेवार, एलसीबी पीआय सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे, पीएसआय भगतसिंह दुल्लत, पोलिस कर्मचारी मनोज वाघ, रामदास तांदळे, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, विकास वाघमारे, प्रसाद कदम, सतीश कातखडे, विक्की सुरवसे, गणेश मराडे यांनी केली.
घरगुती वादातून सरकल्याची सटकली…!
मेहुण्यांशी असलेल्या वादातून त्यांना अडकवण्यासाठी शिरूर तालुक्यातील आनंदगावमध्ये निष्पाप वृद्धाचा खून केला. दिशाभूल करण्यासाठी आरोपी सरकल्या ऊर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण (रा. तागडगाव, ता. शिरूर) चिठ्ठीत मेहुण्यांची नावे लिहिली असल्याची समाेर आले. एसपी पंकज देशमुख, एएसपी सुनील लांजेवार, पीआय सतीश वाघ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पोलिसांसमोरही या प्रकरणात तपासाचे आव्हान होते. पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे नाव लिहलेल्या पाथर्डी तालुक्यातील टाकळी येथील भगवान याच्या मेहुण्यांची चौकशी केली. सरकल्या ऊर्फ भगवान या आपल्या बहिणीच्या नवऱ्याशी आपला वाद असल्याचे पाचही जणांनी सांगितले होते तर घटनेच्या दिवसापासून तोही गायब होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले होते. सरकल्या ऊर्फ भगवान हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. यातून त्याचे व बायकोचे वाद होत असत. टाकळी येथील रहिवासी असलेले बायकाचे भाऊ या कारणावरून सरकल्याला मारहाण करत. त्यांनी बहिणीला माहेरी नेले होते. थेट प्रतिकार करू शकत नसल्याने त्याने वृद्धाचा खून करून मेहुण्यांची नावे चिठ्ठीत लिहिली होती.अखेर, शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातून त्याला बेड्या ठोकल्या गेल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.