By MahaTimes ऑनलाइन | बीड
येथील क्षीरसागर क्षीरसागर परिवाराच्या ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हजारो संख्येने हिंदू-मुस्लीम बांधव सहभागी झाले. हा कार्यक्रम सामाजिक एकतेला बळ देणारा ठरला.
शहरातील महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ. विठ्ठल क्षीरसागर, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
गेल्या अनेक वर्षांपासून क्षीरसागर परिवारातर्फे रमजान ईदनिमित्त ईद मिलाप कार्यक्र माचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्र म खंडित झाला होता. मात्र यंदा परिस्थिती सामान्य झाल्याने सर्व सण, उत्सव थाटामाटात साजरे केले जात आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ईद मिलापचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला.
सध्याच्या वातावरणात कांही लोक भाषणबाजी करून हिंदू-मुस्लीम यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र, अशा परिस्थितीत आयोजित क्षीरसागर परिवाराच्या ईद मिलाप कार्यक्रमात हिंदू-मुस्लीम बांधवांना एकाच मंचावर आणून बंधुभाव वृध्दींगत करण्याचे काम क्षीरसागर परिवाराने केले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.