By MahaTimes ऑनलाइन | बीड
शारदा प्रतिष्ठानचा २३ व्या सामुहिक विवाह सोहळा शनिवार दि. १४ मे रोजी सायंकाळी ६:३५ वाजता गढी (गेवराई) येथील भवानी मंदिर परिसरात संत मंहत व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत होणार आहे. वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी वऱ्हाडी मंडळीसह नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले आहे.
शारदा प्रतिष्ठान गेल्या बावीस वर्षांपासून सातत्याने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करते. मात्र कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत दोन वर्ष विवाह सोहळा खंडित झाला. या संकटानंतर शारदा प्रतिष्ठानने मोठ्या थाटात २३ व्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यात सहभागी होणा-या वधुवरांना शासकिय मदत मिळणार असुन प्रतिष्ठानच्या वतीने वधुवरांना मणिमंगळसुत्र, कपडे, बुट चप्पल, संसार उपयोगी साहित्य दिले जाणार आहे.
विवाह सोहळ्याची शारदा प्रतिष्ठानच्या वतीने पुर्ण तयारी झाली असुन प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, जयसिंग पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व प्रतिष्ठानचे स्वयंसेवक हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. विवाह सोहळ्यास येणा-या संपूर्ण व-हाडी मंडळीच्या भोजनाची शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्था केली आहे.
शारदा प्रतिष्ठानचा हा तेविसावा सामुहिक विवाह सोहळा असुन वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी संत – महंत, मान्यवर, विविध संस्थानचे पदाधिकारी आणि वऱ्हाडी मंडळी उपस्थित राहणार आहेत, या प्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले आहे.