येणाऱ्या काळातही ही चळवळ व्यापक पद्धतीने राबवली जाईल – विजयसिंह पंडित
By MahaTimes ऑनलाइन | बीड
अमरसिंह पंडित यांनी २२ वर्षांपासून शारदा प्रतिष्ठानच्या सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरु केली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि भव्यदिव्य पद्धतीने ही चळवळ सातत्याने सुरु ठेवून प्रतिष्ठानने सामाजिक भान जपले आहे. हा कांहीं राजकीय उपक्रम नाही तर हा एक सामाजिक उपक्रम आहे. अवास्तव खर्चाला फाटा देत येणाऱ्या काळातही ही चळवळ व्यापक पद्धतीने राबवली जाईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. २३ व्या शारदा प्रतिष्ठानच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष जयसिंग पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित, संत महंत सर्वश्री, ह.भ.प. महादेव महाराज भाटेपुरी, ह.भ.प. उद्धव महाराज शास्त्री, ह.भ.प. स्वामी जनार्दन महाराज, ह.भ.प. रघुनाथ महाराज निंबाळकर, ह.भ.प. भगवंत महाराज पट्टे, ह.भ.प.नामदेव महाराज, ह.भ.प. भगवान महाराज जोशी, ह.भ.प. श्रीपाद देवा, ह.भ.प. लिंबाजी महाराज, ह.भ.प. तिर्थराज पठाडे महाराज, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी, ह.भ.प.प्रकाश महाराज रुचके, ह.भ.प. बाळनाथ महाराज येवले, सावता परिषदेचे कल्याण आखाडे, तहसिलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महादेव चिंचोले, डॉ.संजय कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मच्छिंद्र गडाचे मठाधिपती ह.भ.प.जनार्धन महाराज यांनी वधुवरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अमरसिंह पंडित यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात नव वधु चि.सौ.का. शितल निरगुडे व वर चि.अनिल माळवदे आणि चि.सौ.का.अंजली नरके अणि वर चि. अतुल भवार यांना संसारपयोगी साहित्य भेट दीले.
प्रारंभी जयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी परण्या काढण्यात आला.६ वाजून ३५ मिनिटांनी मंगलमय वातावरणात २१ जोडपी हाजारो व-हाडी मंडळीच्या साक्षीने संत महंताच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले. नव वधू वर यांना प्रतिष्ठानच्या वतीने कपडे, मणी मंगळसूत्र, बुट, चप्पल, संसारपयोगी व इतर साहित्य देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, बबनराव मुळे, राजेंद्र वारंगे, श्रीराम आरगडे, बाबुराव काकडे, अप्पासाहेब गव्हाणे, बापु गाडे कुमारराव ढाकणे, महंमद गौस, हन्नान शेठ, बप्पासाहेब मोटे, पाटीलबा मस्के, शामकाका येवले, सुभाष मस्के, फुलचंद बोरकर, संदिपान दातखिळ, अंकुशराव गायकवाड, मदनराव घाडगे, मुजिब पठाण, विलास चव्हाण, उद्धव मोलाने, शांतीलाल पिसाळ, कैलाश नलावडे, ऋषिकेश बेदरे, सुभाषराव मस्के, सुनिल पाटील, दादासाहेब घोडके, प्रताप पंडित, नविद मशायक, सय्यद एजाज, खाजाभाई, वशिम फारोकी, दत्ता दाभाडे, दिपक आतकरे, डॉ. प्रशांत मुदकोंडवार, किशोर कांडेकर, शिवाजी माखले, विश्वांभर काकडे, संदिप मडके, बळीराम खरात आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, व-हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधव चाटे यांनी केले.