अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मागणी
By MahaTimes ऑनलाइन | बीड
फ्लोरेंन्स नाईंटींगल यांचा पुतळा महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी रूग्णालयात बसवावा, शासनाने करार पध्दतीने सेवा करणाऱ्या नर्सेसना सेवेत कायम स्वरुपी सामावून घ्यावे, कोरोना काळात सेवा करणाऱ्या नर्सेसला तिन आगाऊ वेतन वाढ देण्यात यावी. अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
12 मे रोजी पारिचारीकेच्या गौरवा निमित्ताने जागतिक नर्सेस डे साजरा करण्यात येतो. आधुनिक नर्सिंगची सुरुवात करणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा आज २०२ वा जन्मदिन आहे. त्यांचा जन्मदिन जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. गणित आणि सांख्यिकीच्या बाबतीत त्या अतिशय हुशार होत्या. याचा वापर त्यांनी रुग्णालयं आणि तिथे दाखल झालेल्या रुग्णांची स्थिती सुधारण्यासाठी केला. फ्लोरेन्स यांना सुरुवातीपासूनच परिचारिका होण्याची इच्छा होती. त्यांनी त्यांची ही इच्छा आई वडिलांकडे बोलून दाखवली. मात्र त्यांनी विरोध केला. फ्लोरेन्स यांच्या इच्छेपुढे त्यांनी माघार घेतली.
१८२० मध्ये इटलीत जन्मलेल्या फ्लोरेन्स प्रशिक्षणासाठी जर्मनीला गेल्या. १८५३ मध्ये क्रीमिया युद्धादरम्यान त्यांना तुर्कस्थानातील एका रुग्णालयात पाठवण्यात आलं. ब्रिटननं महिलांना त्यांच्या सैन्यात सामील करुन घेतल्याची ही पहिलीच घटना होती. फ्लोरेन्स पहिल्यांदाच लष्कराच्या रुग्णालयात पोहोचल्या, तेव्हा तिथे त्यांना सर्वत्र अस्वच्छता दिसली. त्यांनी सर्वप्रथम संपूर्ण रुग्णालय स्वच्छ केलं. सैन्यासाठी चांगल्या कपड्यांची आणि जेवणाची व्यवस्था केली. फ्लोरेन्स यांच्यामुळे पहिल्यांदाच सैन्याकडे, त्यांच्या गरजांकडे अतिशय लक्षपूर्वकरित्या पाहिलं गेलं. फ्लोरेन्स यांच्या मागणीनंतर एक समिती स्थापन झाली. तुर्कस्तानात १८ हजार सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी १६ हजार सैनिक अस्वच्छता आणि संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यूमुखी पडल्याचं समितीच्या अभ्यासातून समोर आलं.
फ्लोरेन्स यांच्या प्रयत्नांमुळे ब्रिटिश सैन्यात वैद्यकीय, स्वच्छता विज्ञान, सांख्यिकी विभागांची स्थापना झाली. याच विभागांमुळे रुग्णालयांमधल्या स्वच्छतेला महत्त्व आलं. फ्लोरेन्सने रात्रपाळीत हाती कंदील घेऊन काम करायच्या. त्यामुळे त्यांना “लेडी विथ द लॅम्प” म्हटलं जाऊ लागलं. त्यांच्या सन्मानार्थ आजही परिचारिका रुग्णसेवेची शपथ घेताना हातात मेणबत्ती घेतात. या शपथेला नाइटिंगेल शपथ म्हटलं जातं. १८६० मध्ये त्यांच्या नावानं ब्रिटनमध्ये नर्सिंग स्कूलची स्थापना झाली. १३ ऑगस्ट १९१० मध्ये वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी ख्रिस्ताच्या नावात अखेरचा श्वास घेतला. ऑर्डर ऑफ मेरिट हा सन्मान’ मिळवणाऱ्या त्या पहिल्या वहिल्या महिला होत्या.
महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात एवढे उत्तम काम करून आपल्या देशाची सेवा करणाऱ्या परिचारीकांचा गौरव करावयाचा असेल तर करार पध्दतीने सेवा करणाऱ्या नर्सेसना सेवेत कायम सामावून घ्यावे, कोरोना काळात सेवा करणाऱ्या नर्सेसला प्राधान्यांनी कायम स्वरूपी सेवेत सामावून घ्यावे. कोरोना काळात सेवा करणाऱ्या नर्सेसला तिन आगाऊ वेतन वाढ देण्यात यावी. कारण त्यांच्या सेवेची तुलना कशा बरोबरच होवू शकत नाही. परंतु त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तसेच नर्सेस साठी प्रेरणादायी असणाऱ्या फ्रोरेंन्स नाईटिंगल यांचा पुतळा महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी रूग्णालयात बसवावा व पारिचारीकांचा गौरव वाढवावा अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली आहे.