लोकप्रतिनिधी-प्रशासकीय अधिकारी-पत्रकारात ज्वलंत विषयावर खुली चर्चा
By MahaTimes ऑनलाइन | बीड
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ईद-मिलन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव, भगिनी, मिडीयातील विविध विभागातील कर्मचाºयांच्या उपस्थितीने ईद-मिलन कार्यक्रमाला चार चाँद लागले. प्रामुख्याने सद्य परिस्थितीत भोंग्यावरुन जो जातीय तेढ निर्माण केला जात आहे. त्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा बीड येथे पत्रकार संघाच्या पुढाकारातून खुली चर्चा सत्र आयोजित केले होते. यात इतर ही ज्वलंत विषयावर मुक्तपणे संवाद कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाने एकात्मता जपत सामाजिक, समता, बंधुता जपण्याचा संदेश ही दिला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली, दैनिक दिव्यलोकप्रभा चे संपादक संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ईद-मिलन कार्यक्रम सोमवारी (दि. 9 ) रोजी उत्साहात पार पडला. ईद-मिलन निमित्त शिरखुर्मा व इतर पदार्थांचा आस्वाद घेत विद्यमान विविध घडामोडींवर मुक्तपणे विचार मांडून प्रत्येकांनी आपले मत व्यक्त केले.
या खुल्या चर्चेमध्ये माजी मंत्री प्रा.सुरेश नवले, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार प्रा.सुनिल धांडे, माजी आमदार उषाताई दराडे, सुशिलाताई मोराळे, मंगल जगताप, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, माजी नगराध्यक्ष शिवलाल मुळूक, अॅड.चंद्रकांत नवले, राजेश बांगर, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक, माजी नगरसेवक शेख निजाम, नगरसेवक खुर्शीद आलम, सुहास पाटील, योगेश शेळके, ललित आब्बड, लाईफ स्टाईल जिमचे सय्यद आर्शियान, बॉडी बिल्डर शेख दाऊद, डॉ.शेरखान, अॅड. तेजस नेहरकर, गणेश माने यासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी तसेच ज्येष्ठ संपादक काझी मकदूम, ज्येष्ठ पत्रकार गुलाब भावसार, दैनिक सुर्योदय चे संपादक गंगाधर काळकुटे, वादळचे संपादक शेखर कुमार, द्वारकादास फटाले, दैनिक लोकाशाचे भागवत तावरे, दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ खताळ, सकाळचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता देशमुख, दैनिक दिव्य मराठी चे चिफ ब्युरो दिनेश लिंबेकर, रवि उबाळे, अमोल मुळे, दैनिक मराठवाडा साथीचे अॅड.संदीप बेदरे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.जावेद पाशा, चंदन पठाण, अबुबकर, जालींदर धांडे, वृत्तपत्र विक्र ेते, सुदाम चव्हाण, सुमूर्ती वाघिरे, अमित सासवडे, सलामत पठाण, शेख अब्दुल, संपादक संतोष केजकर, सोनाली शहाणे, कार्यारंभच्या श्वेतांबरी घाडगे, युवा वक्ता राहूल गिरी, ज्ञानोबा वायबसे, उत्तम ओव्हाळ, बालाजी जगतकर, संजय हांगे, अमरजान पठाण, प्रचंड सोळंके, कामरान शेख, स्कूल एक्सप्रेसचे शेख एजाज, छायाचित्रकार कृष्णा शिंदे, बीड दर्शनचे पारस पोरवाल, सिद्दीक इनामदार, शेख अदील, सुरेखा जाधव, स्वाती खुळे, अॅड. नंदा भंडारे, सारीका गायकवाड, जालन्याचे शेख फारुक खलील, अंबडचे अरफ मौला आदि मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
ईद-मिलाप कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, बीड जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ जाधव, रईस खान, अमजद खान, शेख आय्युब, शेख वसीम, जिल्हा उपाध्यक्ष शेख आयेशा, श्रीमती प्रतिभा गणोरकर, इरफान शेख, वैजीनाथ चव्हाण, शैलेश गोलांडे, अंकुश शेनकुडे आदिंनी परिश्रम घेतले.
राज्यात होणार ईद-मिलन कार्यक्रम – वसंत मुंडे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी बीड येथील ईद-मिलन कार्यक्र मानिमित्त विद्यमान परिस्थितीमध्ये पत्रकारांनी पुढाकार घेऊन जातीय तेढ कमी करण्याच्या हेतूने चर्चासत्राचे आयोजन केले. या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर असा उपक्रम येत्या 20 मे पर्यंत पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याचे जाहीर केले.