14 कोटी 95 लाख 57 हजार 805 रूपयांची तडजोड
By MahaTimes ऑनलाइन | बीड
जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा व तालुका न्यायालयात 7 मे रोजी राष्टीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये बीड जिल्हयात एकुण प्रलंबीत 28359 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1114 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तसेच दाखलपूर्व 18638 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1022 प्रकरणे निकाली निघाली आहेत. असे एकुण 2136 निकाली निघाली आहेत.
मा. श्री. हेमंत शं. महाजन साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांनी आपआपसातील वाद, तंटे सामोपचाराने व सामंजस्याने मिटवावेत तसेच या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये बीड जिल्हयात ठेवलेली जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावीत असे आवाहन केले.
प्रलंबित प्रकरणात 11 कोटी 2 लाख 39 हजार 898 रूपये व दाखलपुर्व प्रकरणात 3 कोटी 93 लाख 30 हजार 907 रूपये असे या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये एकुण रक्कम 14 कोटी 95 लाख 70 हजार 805 रूपयांची तडजोड करण्यात आली. तसेच दि. 2, 4, 5, 6 मे 2022 रोजी झालेल्या स्पेशल ड्राईव्हमध्ये एकुण 736 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 531 प्रकरणे निकाली निघाली आहेत.
सदरील राष्टीय लोकन्यायालय यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास मा. जिल्हाधिकारी बीड अधिकारी/कर्मचारी, मा. न्यायीक अधिकारी, मा. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बीड, जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, सुरक्षा/पोलीस अधिकारी/कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी, बॅकाचे, पतसंस्थेचे, विमा कंपनीचे अधिकारी/कर्मचारी, महावितरण कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच श्री. बी. बी. झंवर, अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड व सर्व न्यायालयातील न्यायीक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या सर्वाचे आभार मा. श्री. सिध्दार्थ ना. गोडबोले साहेब, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांनी मानले.