डॉ. योगेश क्षीरसागर यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा हा दृष्टिकोन समोर ठेवून माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी अमृत अटल योजनेतून बीडला मंजूर करून आणली. आणि अमृत अटल योजनेतून बीडला ही योजना सुरू करण्यापासून ते सद्यस्थिती पर्यंत पुर्ण करण्यासाठी कायमच पाठपुरावा केला आहे लवकरच बीड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल असे युवानेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन वर्षापासून अमृत जल योजनेचे काम सुरू आहे. याच अमृत योजनेंतर्गत ईट फिल्टर येथून नवीन पाईपलाईन द्वारे 10 MLD अतिरिक्त पाणी बीड शहरासाठी उपलब्ध होत आहे. ईट फिल्टरवरून येणारी मेन पाईपलाईन नाळवंडी रोड वरील सारडा जिनिंग समोरील जलकुंभला (MBR) जोडण्याचे काम आज सुरू करण्यात आले. या दहा एमएलडी अतिरिक्त पाण्यामुळे शहरातील पाणीपुरवठा (टप्प्याटप्प्याने) एक ते दोन दिवसांनी लवकर होईल.
यासोबतच पुनर्वसन कॉलनी च्या वरील भागात दोन जलकुंभ (ESR & MBR) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ज्याचा फायदा हनुमान नगर, पुनर्वसन कॉलनी, बहिरवाडीसह प्रभाग 3 मधील बहुतांश भागाला होणार आहे. आज या कामाची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या.
यावेळी गटनेते फारुख पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, पाणीपुरवठा सभापती सय्यद इलियास, नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ, नगरसेवक मुन्ना इनामदार, अमोल पोळ, आरेफ खान, विकास यादव, दत्ता जाधव व सहकाऱ्यांनी भेट दिली. या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, बीड नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच कंत्राटदाराने नियुक्त केलेले सुपरवायझर उपस्थित होते.