‘राजयोग’ चा हिंदू-मुस्लिम एकोपा वृध्दिंगत करणारा उपक्रम
By MahaTimes ऑनलाइन | बीड
मुस्लिम समाजात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे रमजान ईद. रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर गरजु कुटूंबांची ईद अधिक गोड करण्याचा एक प्रयत्न म्हणून राजयोग फाऊंडेशन च्या माध्यमातून शिरखुर्मा साहित्याचे 500 किट वाटप करण्यात आले.
राजयोग फाउंडेशन चे संस्थापक, पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक दिलीप धुत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक जाणिवेतून गत 5 वर्षांपासून हजारो कुटुंबांना दिवाळीला फराळ वाटप व 3 वर्षांपासून रमजान ईद निमीत्त शेकडो कुटुंबांना शिरखुर्मा साहित्य वाटप चा हा हिंदू-मुस्लिम एकोपा वाढवणारा उपक्र म अविरत सुरु आहे.
यावर्षी युवा नेते तथा न.प.सदस्य डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत या साहित्य वाटपाची सुरु वात करण्यात आली. त्यानंतर मी माङया सहकार्यासह शहरातील विविध भागात जाऊन या शिरखुर्मा किट वाटप केले. यामधे विधवा, अपंग, निराधार, रोजंदारीकरणार्याचा पण समावेश आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन मधे सर्वकाही बंद असताना राजयोग फाउंडेशन च्या माध्यमातून रामनवमी ते रमजान ईद – सतत 50 दिवस मदतकार्य सुरु होते, गेली 2 वर्ष लॉकडाउन असल्याने ईद मोठ्या प्रमाणात साजरा झाली नाही, त्यावेळी देखील याच प्रकारे शेकडो गरजु कुटुंबांना शिरखुर्म्याचे साहित्य उपलब्ध करु न रमजान ईद गोड करण्यात आली होती.
यावेळी नगरसेवक शेख इकबाल, मुश्ताक अंसारी, अबुबकर चाऊस, शेख इसाक, अमर विद्यागर, आमेर सिद्दीकी, नबीलजमा, युवासेना शहरप्रमुख शुभम कातांगळे, इकबाल भाई, शारेख झकेरीया, समीर तांबोळी, अजय नाईकवाडे, ऋषभ वाघमारे, काशिफ चाऊस, सय्यद आमेर, गणेश गुरखुदे, अभिजित आव्हाड, विशाल वाघमारे, वैभव जाधव, शैलेश गिरी, सागर वाहुळ, अतिश अंधारे, अभिनंदन सारडा, आदित्य सातपुते, अरबाज सय्यद यांच्यासह इतर उपस्थित होते.