By MahaTimes ऑनलाइन | बीड
आझाद हिंद बहूऊद्देशिय सेवाभावी संस्था म.कामखेडा.ता.बीड या संस्थेला सन 2021 चे अल्पसंख्यक विकास विभाग महाराष्ट्र यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक बीड याच्या तपासनी नंतर अल्पसंख्यक पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यास मान्यता दिली होती. मान्यते नुसार सदर संस्थेने दि. 21 / 01/2021 ते 30/3/2021 या कालावधीत प्रशिक्षण अतिउत्कृष्ट पूर्ण करून घेतले होते.
निवड झालेल्या उमेदवारास नाष्टा,अल्पोपाहार, गणवेश कीट, शैक्षणिक साहित्य चांगल्या दर्जाची देण्यात आली होती. तसेच सर्व विषयांचे तासीका घेण्यात आल्या. व त्यावर दोन लेखी परीक्षा घेण्यात आल्या.तसेच मैदानी प्रशिक्षण दर्जेदार देऊन मुलामुलींनी स्पर्धेतटिकण्या साठी तैयार करून घेण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उशीरा का होईना पण शासनाने मंजूर केलेले प्रती उमेदवार तीन हजार रूपये ए.आय. एम आय एम चे जिल्हाध्यक्ष ऑडो शेख शफीक भाऊ, भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड चे सदस्य सय्यद खाजा ,संस्थेचे सचिव शेख मुसा यांच्या हस्ते ईद पूर्वी वाटप झाल्याने अल्पसंख्यक उमेदवार आनंदीत झाले.मानधन मंजूर करून देण्यासाठी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन मा.अंधारे साहेब, अल्पसंख्यक विभाग बीड चे मुन्डे साहेब यांनी सहकार्य केले.