प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे दिले आश्वासन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने राज्य संपर्क प्रमुख राजेंद्र खेडकर व शिक्षक नेते शेख मुसा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या समवेत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. यावेळी सीईओ पवार यांनी प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान प्राथमिक शिक्षकांच्या प्रमुख मागण्या दरमहाचे वेतन वेळेवर करणे व होणारा विलंब टाळणे, वैद्यकिय प्रतिपूर्तीचे प्रस्ताव दरमहाची बैठक घेऊन निकाली काढणे, शिक्षकांनी पुढील शिक्षणासाठीचे मंजूरीचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. त्या संबंधीचे आदेश निर्गमित करणे, त्याच प्रमाणे रमजानचा सन हा जागतिक स्तरावर होत असल्याने शिक्षकांचे माहे एप्रिलचे वेतन हे 30 एप्रिल 2022 पर्यंत करावेत. यासाठी निधी कमी पडत असल्याचे मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.बीड यांनी प्रत्यक्ष भेटीच्या वेळी सांगितले. तेंव्हा वरिष्ठांकडे त्वरीत निधीची मागणी करण्यात येईल असे शिक्षणाधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सांगितले आहे.
तसेच चटोपाध्याय व निवडश्रेणीचे जे प्रस्ताव शिक्षण विभागात दाखल झालेले आहेत. त्यांची सेवा जेष्ठता व त्यासाठी ज्या नियम अटी आहेत. त्या पूर्ण असतील तर ते पाहून निकाली काढण्यात येईल. शिक्षकांच्या संगणक, भाषा सुट, शिक्षकांचे स्थायीत्व हे ज्या शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे दाखल आहेत. त्यांचे निकाली काढण्यात येतील.
सेवा जेष्ठतेनुसार केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक पदाचे पदभार देणे यासोबतच ज्या शिक्षकांचे जात पडताळणीचे प्रस्ताव जमा करु न जातपडताळणी करणे, दिव्यांग शिक्षकांचे वाहन भत्त्याचे प्रस्ताव निकाली काढणे बीड जिल्हा परिषदेने ज्या शिक्षकांना जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना न्यायालयाच्या आदेशान्वये इतर जिल्हा परिषदेने एक आगाऊ वेतन वाढ दिलेली आहे. त्याच धर्तीवर बीड जिल्हयातील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ देणे, कोव्हीड कालावधीमध्ये मयत झालेल्या शिक्षकांना सानुग्रह अनुदान देणे, व त्यांच्या पाल्यांना अनकंपातत्त्वावर शासकीय सेवेत नौकरी देणे, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली अद्यावत करणे. जिल्हा परिषद अखत्यारित सर्व प्रलंबित प्रश्नांवर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार व मुख्य लेखा अधिकारी जटाळे साहेब यांच्या समवेत चर्चा झाली यावेळी राजेंद्र खेडकर, शेख मुसा, दिलीप खाडे, महेश सातपुते, सुरेंद्र गोल्हार, अरु ण घुले. जी के. योगेश सोळसे, रमेश मोराळे, हकीम मनियार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या आहेत प्रमुख मागण्या
- रमजानचा सणानिमित्त शिक्षकांचे पगार 30 एप्रिल पर्यंत करावेत.
- चटोपाध्याय व निवडश्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढावेत.
- केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक पदाचा पदभार सेवा जेष्ठतेनुसार देणे.
- शिक्षकांचे जात पडताळणीचे प्रस्ताव जमा करु न जातपडताळणी करणे.
- दिव्यांग शिक्षकांचे वाहन भत्त्याचे प्रस्ताव निकाली काढणे.
- जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ देणे.
- कोव्हीड कालावधीमध्ये मयत झालेल्या शिक्षकांना सानुग्रह अनुदान देणे.
- कोरोनाकाळात मयत शिक्षकांच्या पाल्यांना अनुकंपातत्त्वावर शासकीय सेवेत घेणे.
- प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली अद्यावत करणे.