7 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात ; 25 एप्रिल रोजी मतदान अन् मतमोजणी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिल्हा वकील संघाची निवडणूक चा कार्यक्रम सुरू झाला आहे. 7 जागांसाठी 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असून 5 अपक्षही मैदानात आहेत. 25 एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. बालाप्रसाद करवा यांनी दिली.
18 व 19 एप्रिल हे दोन दिवस उमेदवारी अर्ज करण्याचे होते. 20 एप्रिलला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यात एकता पॅनलतर्फे विनायक जाधव, सुभाष पिसुरे, सुशील वडमारे, फिरोज शेख, रंजित सोनवणे, किशोर कसबे व गीता वझे या उमेदवार आहेत. तर, स्वाभिमान पॅनलच्या वतीने शहादेव नन्नवरे, राहुल साळवे, भालचंद्र गोस्वामी, सुरेश हंगे, विकास सांगळे, शरद तिपाले व विद्या गायकवाड या उमेदवार आहेत.
परिवर्तन पॅनलने महेंद्र जाधव हे सचिवपदासाठी तर सुनील साळवे हे कोषाध्यक्षपदासाठी 2 उमेदवार निवडणूक मैदानात उतरवलेत. अध्यक्षपदासाठी गणेश करांडे, सहसचिव पदासाठी सुरेश कांबळे, तर महिला प्रतिनिधी पदासाठी छाया कांबळे हे 3 अपक्षही रिंगणात आहेत. एकूण 19 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 25 एप्रिल रोजी जिल्हा वकील संघाची निवडणूक मतदान अन् त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.