By MahaTimes ऑनलाइन – बीड |
आशना जमाल गुलरेज नोमान शेख आणि इकरा फातेमा जिलानी शेख या दोघी मावस बहिणींनी रविवारी (17. April) पवित्र रमजान महिन्यातील 15 वा रोजा धरला. ह्या दोघिंनी वयाच्या 9 व्या वर्षी जीवनातील पहिला रोजा ठेवुन सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
आशना जमाल ही बीड शहरातील शहेंशाहनगर येथील रहिवाशी आणि इकरा फातेमा ही अंबाजोगाई शहरातील शिवाजी चौक परिसरातील रहिवाशी आहेत. दोघीही इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनी आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील सेवानिवृत्त हेड क्लार्क शेख दाऊद यांच्या त्या नाती आहेत. रविवारी या दोघिंनी बीड येथे आजोळी 14 तासांचा कडक रोजा धरला. त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.