भेटीदरम्यान विविध सेवा योजना बाबत घेणार आढावा
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण या सोमवार दि.18 एप्रिल रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून सकाळी 11 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट देणार आहेत.
भेटीदरम्यान निर्भया पथक, महिला सेल, कंट्रोल रूम यांची माहिती घेणार आहेत. तसेच आपल्याकडे डी. व्ही. केसेस किती आहेत, अंतर्गत तक्रार निवारण समिती, मिसिंग केस, बालविवाहाचा केसेस, रेप केसेस नोंदवल्या किती व सोडवले किती, चाइल्ड मिसिंग केसेस, सखी वन स्टॉप सेंटर, महिला विषयक योजनांची माहिती घेणार आहेत.
तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब यांच्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना, महिला ऊस तोड कामगार प्रश्न, पोलीस स्टेशन आवारातील समुपदेशन केंद्र, तृतीयपंथी यांकरिता राबविण्यात आलेल्या सेवा योजना याबाबत आढावा महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण घेणार आहेत.