एकास दोषी ठरविल्याने इतर लाचखोरांचे धाबे दणाणले
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
माजलगाव तालुक्यातील वाधुरा सज्जा चे तलाठी अतिरिक्त पदभार राजेगाव यांना 2 हजार रुपयांची लाच घेतांना 23 सप्टेंबर 2011 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी कार्यालय, शाहुनगर, माजलगाव येथे छापा मारून रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणाचा निकाल मंगळवारी (दि. 12) रोजी लागला असून माजलगाव न्यायालयाने आरोपी लोकसेवक रविंद्र वसंतराव मडकर (Ravindra Vasantrao Madkar) (54 वर्ष) यास गुरन.कलम 7,12,13 (1) (ड) सह 13,(2) नुसार दोषी ठरवत एक वर्षाचा साधा कारावासाची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावली.

सदरची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायालय, माजलगाव-1 यांचे न्यायालयाकडुन सुनावण्यात आली. अधिक माहिती अशी की, माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील वाधुरा सज्जा चे तलाठी अतिरिक्त पदभार राजेगाव यांनी तक्रारदारास दो हजार रूपए लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची ईच्छा नव्हती. त्यांनी बीड (Beed) येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयास संपर्क (Contact) करून तक्रार (Complaint) नोंदविली होती.

दाखल तक्रारिची खातरजमा करीत रविंद्र वसंतराव मडकर (वय 54 वर्ष) यास गेवराई (Georai) येथील तलाठी सजा वाधुरा अति.पदभार राजेगाव यांस 2000 हजार रूपये घेताना पंचासमक्ष रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर ठाण्यात या प्रकरणी गुरनं.31/2011 कलम 7,12,13(1)(ड) सह 13,(2) भ.प्र.अ.1988 गुन्हा दाखल झाला होता. सदरचा तपास हा तात्कालीन पोलीस उप- अघीक्षक श्री.भिमराव शिंगाडे (Mr. Bhimrao Shingade) यांनी पूर्ण करून मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायालय, माजलगाव-1 यांचे न्यायालयात दोषारोप दाखल करुन सदरचा खटला मा.सहायक सरकारी अभियोक्ता, माजलगाव श्री.रणजीत वाधमारे यांनी शासनातर्फे युक्तीवाद करुन सदर गुन्हयात आरोपी लोकसेवक रविंद्र वसंतराव मडकर यास मा.न्यायालयाने दोषी ठरवुन वरील शिक्षा ठोठावली. एका तलाठ्यास लाच मागितल्या प्रकरणी दोषी ठरविल्याने इतर लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.
सदर न्यायालयाचे कामकाज पोलीस उप-अधीकषक श्री.शंकर शिंद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार सुदर्शन निकाळजे यांनी कामकाज पाहीले.
