By MahaTimes ऑनलाइन – बीड |
राष्ट्रवादी कांग्रेस चे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री (दि. 12) रोजी धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा त्रास ऊद्भवल्याने तातडीने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मंगळवाऱी संध्याकाळी धनंजय मुंडे यांना छातीत त्रास जानऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का बसला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेले आहे.
डॉक्टरांनी आवश्यकत्या चाचण्या केल्या आहेत. बुधवारी सकाळी अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे रुग्णालयात उपस्थित होते. धनंजय मुंडे फिटनेस कडे विशेष लक्ष देत असतात. फिटनेस बाबत सजग असल्यामुळेच दोन वेळा त्यांनी कोरोनाला हरविले.