By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर, गढी येथे हिंदी विभागाच्या वतिने अतिथि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बलभीम महाविद्यालयाच्या हिंदी विभागातिल प्राध्यापक डॉ. मारोती यमुलवाड हे प्रमुख पाहुणे होते. तर अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना बलभीम महाविद्यालयाच्या हिंदी विभागातिल प्रा. डॉ. मारोती यमुलवाड यांनी हिंदी एकांकी साहित्य या विषयावर अतिथि व्याख्यान देतांना म्हणाले कि आजच्या पिढीला मूल्य शिक्षणाची खरी गरज आहे. कारण दिवसेन दिवस समाजात नैतिक मूल्यांचे अधपतन होत आहे. खरी गरज आहे याचे संवर्धन करण्याचे आणी हे समाजहित व नैतिक मूल्याचे संवर्धन साहित्यातुन होते. नाटक व एकांकी साहित्यावर प्रकाश टाकला. नाटक व एकांकी यातिल अंतर सागुन साधर्म सांगितले. हिंदी एकांकी साहित्य चा उदभव व विकास सांगून त्याचे प्रकार सांगितले.
खऱ्या अर्थाने साहित्य मानसिक, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौध्दिक आणी आध्यात्मिक विकास करण्याचे साधन आहे. मनुष्याच्या ह्रदयाची कठोरता दूर करुन कोमलता वाढविण्यासाठी काम करित असते. मानवा मध्ये कमी होत चाललेली आपलेपणा व आपुलकीची भावना वाढविण्याचे काम करते. आजच्या पिढीला मूल्य शिक्षणाची खरी गरज आहे हे सर्वांनची अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे असे प्रतिपादित केले.
अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे यांनी अतिथिचे स्वागत करुन विद्यार्थ्यांंना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलतांना म्हणाले कि विद्यार्थ्यांंना साहित्याची गोडी तुम्हाला लागली पाहिजे कारण समाज जीवनाचे वास्तविक आणी आदर्श चिञण साहित्यात असते. वाचन संस्कृति हळू हळू कमी होत चालली आहे ही जोपासने आपले कर्तव्य आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यार्थिनी कु. गीरी शामलनी केले. सूञसंचालन हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. संतोषकुमार यशवंतकर यांनी केले तर आभार विद्यार्थिनी कु. अपेक्षा सावंत मानले.
टिप्स आणि ट्रिक्ससाठी खालील वेबसाइटला भेट द्या
www.thetechnotips.com