शिक्षण संस्थेचा सचिव, मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या जाळ्यात
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास थकलेला पगार व सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी 12 लाखांची लाच मागून पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात दीड लाख रूपयाची रोकड स्वीकारतांना स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तीसह संस्था अध्यक्षास बीड येथील
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई केजमध्ये 2 एप्रिल रोजी रात्री करण्यात आली. संस्था सचिव, मुख्याध्यापकासह चौघांवर केजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघे फरार आहेत. केज तालुक्यात घडलेल्या या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा थकलेला पगार व सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या विरुद्ध संस्थेच्यावतीने उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी कथित स्वरूपात गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, तांबवा चे सचिव अशोक हरिभाऊ चाटे, गणेश माध्यमिक विद्यालय, तांबवा चे मुख्याध्यापक अनंत बाबुराव हांगे, सानेगुरुजी विद्यालय, तांबवा चे अध्यक्ष उद्धव माणिकराव कराड तिघांनी 12 लाख रुपये
लाचेची मागणी केली. तक्रारदारानेलाचलुचपतकडे तक्रार केली. पहिल्याटप्प्यात दीड लाख रुपये देण्याचे ठरले. दत्तात्रय धस याचे केजमध्ये औषधी दुकान असून, लाचेची दीड लाख रुपयांची रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार ‘एसीबी’ने सापळा रचला. दत्तात्रय धस याला दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर संस्थाध्यक्ष उद्धव कराड यास अटक केली आहे.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला असता आरोपींनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली तसेच पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये स्विकारताना पंचासमक्ष भगवान मेडिकल स्टोअर येथे रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल धस, पोह.सत्यनारायण खेत्रे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, भरत गारदे, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, स्नेहलकुमार कोरडे, संतोष राठोड, अविनाश गवळी व चालक गणेश म्हेत्रे यांनी केली आहे.
