सेल्फीच्या नादात तिघेजण नदीत पडले, वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील दुर्दैवी घटना
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
नव विवाहिता तिचा पती व पतीचा मित्र अश्या तिघा जणांचा नदीत बुडून दुर्दैवी नवदांपत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे शनिवारी घडली. सेल्फीच्या नादात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
सदर घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहिम राबवली. बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील एका खाजगी शाळतील शिक्षकाच्या ताहा शेख (20) नामक मुलीचा चार महिन्यापूर्वी अंबड तालुक्यातील ढाकरगाव येथील सिद्दीकी शेख (22) विवाह झाला होता.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030
विवाहानंतर मुलगी, जावई आणि जावयाचा मित्र असे तिघेजण सासरवाडीत आले होते. शनिवारी दुपारी जेवण झाल्यानंतर चारच्या सुमारास मुलगी, जावई, जावयाचा मित्र आणि नात्यातील दोन लहान मुले असे पाच जण फिरण्यासाठी बाहेर पडले. समोर असलेल्या नदीच्या पाण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. नदीच्या पात्रात सेल्फी काढत असताना तोल गेला. नदीमध्ये वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड़याचा अंदाज न आल्याने ते बुड़ाले आणि अशा प्रकारे नवदांपत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाला.