By MahaTimes ऑनलाइन – बीड |
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना तालुका शाखा माजलगावच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक व राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक मंडळाचा नुकताच सत्कार घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजलगाव पंचायत समिती चे उप सभापती डॉ. वसीम मनसबदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एम. ए. गफ्फार साहेब, विठ्ठल आरबे सर व परमेश्वर शिंदे सर, मार्गदर्शक मुजतबा साहेब, खतीब निसार अहेमद आदीसह अंबाजोगाई, केज, धारु र, परळी, बीड, येथील उर्दू संघटना तसेच माजलगाव तालुक्यातील इतर संघटना चे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते अन्सारी असरार, श्रीमती कौसर रिजवाना, शिक्षक पतसंस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी कपील डोंगर (अध्यक्ष), पुरु षोत्तम काठुळे (उपाध्यक्ष), साहेबराव चव्हाण (सचिव), राज खुडे (कोषाध्यक्ष), संजय मकसरे, दिपक भालेराव, गौतम पौळ, बाळासाहेब सोनसळे, अशोक लांडगे, राहुल टाकनखार, लक्ष्मण सरवदे, अमोल राऊत, बाजीराव शिंदे, श्रीमती. सुनंदा पाचनकर, श्रीमती. सुनिता बडे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद अय्युब, प्रास्ताविक सिद्दीकी एजाज यांनी केले. शेख इसराईल यांनी आभार मानले.