महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनास निर्देश
By MahaTimes ऑनलाइन – मुंबई |
राज्यातील जनतेसाठी मोठी दिलासा दायक बातमी आहे. कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शनिवारपासुन मास्कचा वापर ऐच्छिक राहणार आहे. आपण मास्कला बाय बाय करून मोकळा श्वास घेउ शकता. मात्र, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने मास्क घालणे आवश्यक आहे.
आपली सुरक्षा आपल्या हातात आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, नागरिकांनी स्वेच्छेने मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध 2 एप्रिल पासुन पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030
गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला. याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.
महाराष्ट्रातील निर्बंध हटले
- मास्क न घातल्यास कुठलीही कारवाई़ नाही.
- नागरिकांनी स्वेच्छेने मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक.
- सगळे सण-उत्सव साजरे करता येणार.
- गुढीपाडव्याला मिरवणुका-शोभायात्रा काढता येणार.
- रमजान उत्साहात साजरा करता येणार.
- बस- ट्रेनमध्ये आता 100 टक्के क्षमतेने प्रवास.
- सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार.