औरंगाबाद व जालण्याच्या 7 जणांच्या पत्यावर आलेला शस्त्रसाठा जब्त
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
औरंगाबाद शहरातील निराला बाजार मध्येअसलेल्या एका नामांकित कुरियर वर पोलिसांनी छापा टाकला आणि पार्सल बॉक्स मध्ये 37 तलवारी व एक कुकरी आढळून आली. ह्या तलवारी औरंगाबाद व जालना येथील सात जणांच्या पत्यावर आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.
शहरात पुन्हा एकदा कुरियरने तलवारी मागविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आज सकाळी क्रांती चौक पोलिसांनी निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरवर छापा मारत पार्सल बॉक्समध्ये एक कुकरी आणि 37 तलवारी असा एकूण 1,16000 रुपयांचा अवैद्य शस्त्रसाठा मिळून आला. सदरील तलवारी या पंजाब येथून मागवण्यात आल्या असून औरंगाबाद व जालना येथे डिलीवरी करण्यात येणार होती अशी माहिती आहे. शहरात कुरिअरने तलवारी मागविण्याची ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद आणि जालना येथील 7 ग्राहकांचे पत्ते या पार्सलवर आढळून आले आहेत.
औरंगाबादचे सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना गुप्त माहितीद्वारे एका कुरियर मध्ये तलवारी आल्याची माहिती मिळाली. क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने निराला बाजार येथील एका नामांकित कुरिअरच्या कार्यालयावर पोहचून कुरिअर व्यवस्थापक वाल्मिक जोगदंड यास विचारणा केली असता, त्याने असे कोणतेही पार्सल आले नसल्याचे सांगितले.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030
मात्र मिळालेली माहिती खात्रीलायक असल्याने पोलिसांनी कार्यालयाची झाडाझडती घेतली असता पार्सल बॉक्समध्ये एक कुकरी व 37 तलवारी मिळून आल्या. हा तलवारीचा साठा सात ग्राहकांच्या नावावर मागविण्यात आला होता. यात पाच औरंगाबादचे असून दोघे जालन्याचे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी दिली. या प्रकरणी कुरीअरकंपनीचा मॅनेजर व मागणी करणाऱ्या विरोधात याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गु.र.न / 2022 कलम 4 /25 भा.ह.का. सह कलम 135 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.ही कामगीरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 उज्ज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गणपत दराडे पोनि. पोस्टे क्रांतीचौक पोउपनि विकास खटके, प्रभाकर सोनवणे, एएसआय नसीम पठाण,एस. आर. पवार, जमादार नरेद्र गुज्जर , मोहीते, शिंपी ,नरवडे, पोलिस नाईक मनोज चव्हाण, संतोष सूर्यवंशी, पोलिस अंमलदार हनुमंत चाळणेवाड यांनी केली आहे. हा शस्त्र साठा कोठून आला व कोणी पाठविला. ते सात ग्राहक कोण आहेत यासंदर्भात तपास करण्यात येत आहे.
आणखी तीन तलवारी जप्त; एकास अटक
शहरात कुरिअरने तलवारी आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर औरंगाबाद शहर पोलिसांनी निराला बाजार येथील एका नामांकित कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकत 37 तलवारी जप्त केल्या होत्या. मात्र त्यावर दिलेले पत्ते आणि मोबाइल नंबर बनावट असल्याचे समोर आले होते. मात्र पोलिसांनी तांत्रिक दृष्टीने तपास करत जयसिंगपुऱ्यात राहणाऱ्या अबरार शेख जमिल उर्फ शाहरुख याला ताब्यात घेतले. त्यानेच ऑनलाइन तलवारी मागवल्या असल्याचे कबूल केले आहे. विशेष म्हणजे कारवाई पूर्वी सुद्धा त्याने पाच तलवारी मागवल्या होत्या. विशेष म्हणजे ऑनलाइन पद्धतीने सहाशे ते आठशे रुपयांत खरेदी केलेली तलवार तीन ते साडेतीन हजार रुपयाला हा आरोपी विक्री करत असल्याचे सुद्धा तापसात समोर आले आहे.
औरंगाबादेत यापूर्वी ही अवैध शस्त्र साठा आढळून आला असूल तलवारी सारख्या तीक्ष्ण हत्यारे मिळण्याची ही तिसरी घटना आहे.