गेवराई तालुक्यातील नि.जवळका-पाचेगाव-धानोरा रस्त्याचे होणार डांबरीकरण
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका – पाचेगाव – तळवट बोरगाव – धानोरा – जळगाव मंजरा या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ बुधवारी (दि.३०) रोजी सायं.६ वाजता पाचेगाव चौक येथे विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते होणार आहे.
बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामात लक्ष घातले असून स्वतः आमदार नसतानाही राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेचा वापर ते मतदार संघातील विकास कामांसाठी करून घेत आहेत.
पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मंजुर करून घेण्यात त्यांना यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरु आहेत.
निपाणी जवळका-पाचेगाव-तळवट बोरगाव-धानोरा-जळगाव मंजरा या १६.५० किमी लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजुर करून घेण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी प्रयत्न केले. बुधवारी सायं. ६ वाजता पाचेगाव चौक येथे या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्याहस्ते होणार असून याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030
कार्यक्रमाला बीड जि.प. चे माजी सभापती बाबुराव जाधव, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, पंचायत समितीचे माजी सभापती अप्पासाहेब गव्हाणे, पं.स. सदस्य लक्ष्मण देवकर, माजी जि.प.सदस्य बाबुराव काकडे, संचालक विश्वंबर काकडे, सरपंच इम्तियाज पटेल, माजी सरपंच मोतीराम गाडे, मुजीब पठाण, सरपंच अॅड.योगेश गव्हाणे, सरपंच संजय राठोड, सुभाष राठोड, साहेबराव राठोड, विष्णू राठोड, भाऊसाहेब काळे, नारायण हातोटे, यायाह पटेल, शहादेव खरसाडे, चेअरमन बाबुराव शिंदे, बाबुराव गाडे, बिपीन डरफे, भगवान मते, शिवाजी खरसाडे, प्रविण मिटकरी, रावसाहेब बनसोडे, अमोल डरफे यांच्यासह आदी मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे पाचेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आणि वाहन धारकांना मोठा फायदा होणार आहे. या भागातील वाहन धारकांची प्रलंबित मागणी या निमित्ताने पूर्ण होणार आहे. रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी पंचक्रोशीतील नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पाचेगाव सर्कलच्यावतीने करण्यात आले आहे.