शिवसैनिकात नवचैतन्याचे वातावरण, राजकीय समीकरण निश्चित बदलणार
By MahaTimes ऑनलाइन – बीड | रईस खान
एकेकाळी जिल्ह्यात पावरफुल असलेल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कोणाची नजर लागली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीने नुकताच आपला जिल्हाध्यक्ष बदलाच राष्ट्रवादी कांग्रेसच्या घड्याळाचे काटे उलटे फिरू लागले आहे. आज सोमवारी सायंकाळी 6 वा. बीड नगर पालिकेचे गटनेते फारूख पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, नितीन लोढा, बाबुशेठ लोढा, जि.प सदस्य गंगाधर घुमरे व यांच्यासह असंख्यकार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. यापक्ष प्रवेशामुळे बीड विधानसभा व गेवराई मतदार संघातील राजकीय समीकरण बदलणार एवढे मात्र खरे.
वरिष्ठ नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर जेंव्हा शिवबंधन बांधले तेव्हापासुन शिवसेनेला गत वैभव प्राप्त होऊ लागले आहे. त्यांनी पुर्ण अनुभव पणाला लावुन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी खिळखिळी करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. राष्ट्रवादीतील गटबाजी आणि पक्षाला लागलेली गळती हे पक्षनेतृत्वासमोर मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदिप क्षीरसागर यांच्या कार्यपध्दतीमुळे नाराज होऊन बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हा पक्ष प्रवेश सोहळा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत आज सायंकाळी 6 वा. जिल्हा परिषद समोरील मैदानात पार पडणार आहे.
वर्षभरापूर्वी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कार्यकत्यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानीय नेते त्यांचे विश्वास संपादन करण्यात सपशेल अपयशी ठरले. एवढेच काय जिल्हयाचे ‘पालक’ असलेल्या नेत्याने देखील या कार्यकत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मागील कांही महिण्यांपूर्वी संपर्क अभियान राबवून देखील नाराज कार्यकत्यांचे मण वळविण्याचा प्रयत्न केला नाही. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात मोठे पद मिळाले मात्र, पक्षाला गळती का लागली हा नेत्यांसाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदावरून बजरंग सोनवणे यांना दूर सारून राजेश्वर चव्हाण यांच्याकडे आले.
ते नवे-जुने पदाधिकयांची मोट बांधतील असे वाटले होते मात्र ते सत्कार घेण्यातच मग्न दिसत आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर अनुभवी अनिल जगताप यांची वर्णी लागली. त्यानंतर कांही दिवसांतच शिवसंपर्क अभियानास मिळालेल्या यशामुळे जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेत इन्कमिंग सुरू झाले असुन आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या दृष्टीने या पक्ष प्रवेशास महत्व प्राप्त झाले आहे.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030
फारुख पटेल, अमर नाईकवाडे, नितीन लोढा, बाबुशेठ लोढा व गंगाधर घुमरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने बीड मतदारसंघात भगवे वादळ निर्माण होत आहे. शिवसेनेच्या प्रवेश सोहळ्याला या कार्यक्रमाला समर्थकांसह तरुण व जेष्ठ नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा नेते नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, गजाजन कदम यांनी केले आहे.