नकली दूधाचा गोरखधंदा ; एकजण ताब्यात
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
पाटोदा तालुक्यातील नागेशवाडीत शेकडो लिटर केमिकलयुक्त दूध डेअरीवर सर्रास विक्री केला जात होता. सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. 25) सकाळी सात वाजता छापा टाकून एकास रंगेहाथ पकडले. दरम्यान पोलिसांनी केमिकल साहित्य सहित हजारो रूपयाचा माल जब्त केला आहे. पोलिस सह अन्न व औषधी प्रशासनच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाईमुळे बीड जिल्ह्यात नकली दूधाचा गोरखधंदा उजेडात आला आहे.

अधिक माहिती अशी की, आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे (रा. नागेशवाडी) हा स्वत:च्या फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळत पाटोद्याच्या नागेशवाडीत केमिकलयुक्त दूध सर्रासपणे केमिकल पावडर पासून दूध तयार करून तो भेसळ करून डेअरी वर विक्री करीत होता. या संदर्भात सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळताच त्यांनी वेळ न दवडता पोलिस कर्मचारीसह अन्न व औषधी प्रशासन अधिकारी पाठवून छापा टाकला.

यावेळी पथकाने एका संशयीत व्यक्तीस ताब्यात घेत त्याच्या कडून 160 लिटर भेसळयुक्त दूध व 49 हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जमादार बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, विकास चोपणे,राजू वंजारे, महिला पोलिस अंमलदार आशा चौरे, अन्न भेसळ अधिकारी श्री. गायकवाड व श्री.कांबळे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
