जिल्ह्यात 5454 उमेदवार, 18 उपकेंद्रामधून घेण्यात येणार परिक्षा
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
महाराष्ट्र गट-क सेवा MPSC संयुक्त (पूर्व) परीक्षा -2021 अंतर्गत उद्योग निरीक्षक, गट-क उद्योग संचालनालय, विमा संचालनालय, कर सहायक, गट-क लिपिक, टंकलेखक (मराठी), गट-क व लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) ही पदे भरली जाणार आहेत. दि. 3 एप्रिल 2022 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकूण 18 उपकेंद्रामधून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 5454 उमेदवार बसलेले असून, या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने प्रत्येक जिल्हा केंद्रासाठी वरिष्ठ दर्जाचा अधिकारी विशेष निरीक्षक म्हणून नियुक्त केला जाणार आहे.
परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर उमेदवारांना त्यांच्याकडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रीक वस्तु व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावरघेवून जाता येणार नाही. आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हींग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
उमेदवारांना त्यांच्या परीक्षेसाठी परीक्षा उपकेंद्रावर सकाळी 8.30 वाजेपूर्वी उपस्थित रहाणेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. परीक्षा सुरु झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबी खाली प्रवेश दिलाजाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी, यांनी कळविले आहे.
परिक्षा केंद्राचे नाव व विद्यार्थी संख्या
चंपावती माध्यमिक विद्यालय, नगर रोड (432), चंपावती इंग्लिश स्कुल नगर रोड (264), चंपावती प्राथमिक विद्यालय
नगर रोड (264), शिवाजी विद्यालय, कनॉल रोड (384), सौ. के. एस. के महाविद्यालय, शिवाजी नगर (264), संस्कार विद्यालय, नवीन भाजी मंडई (384), स्वा वीर सावरकर माध्यमिक विद्यालय, सराफा लाईन (312), व्दारकादास मंत्री राजस्थान विद्यालय, विप्रनगर रोड (336), गीता कन्या प्रशाला, सुभाष रोड (240), गुरुकुल इंग्लीश स्कुल, जालना रोड (360), श्री छत्र्पती शाहू माध्यमिक विद्यालय, शाहू नगर (240), बंकट स्वामी महाविद्यालय, जालना रोड (240), द. बा. घुमरे पब्लिक स्कूल, मुक्ता लॉन्स जवळ (240), एम. एस. पी. लॉ कॉलेज, बार्शी रोड (288), गव्हरमेन्ट पॉलिटेकनिक कॉलेज, खंडेश्वरी, नाथापूर रोड (240), भगवान विद्यालय, धानोरा रोड (384), डॉ. बापूजी सांळूखे माध्यमिक विद्यालय व डिएड कॉलेज (240) आणि बलभीम महाविद्यालय, किल्ला मैदान (360) या 18 उपकेंद्रावर परिक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू
परीक्षेसाठी एकूण 5472 उमेदवार बसलेले असून, परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौ.प्र.सं.1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला असल्याचे आदेश, उपविभागीय दंडाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिले आहेत.